जिल्ह्यात होळी सणाचा उत्साह; पावसाच्या सरीत धुळवड साजरी

जिल्ह्यात होळी सणाचा उत्साह; पावसाच्या सरीत धुळवड साजरी

मुरुड: ‘होळी रे होळी,पुरण्याची पोळी & ’असे म्हणत होळी उत्साहात साजरा करत असतानाच मंगळवारी सकाळी पावसाने काही भागात हजेरी लावल्याने पावसाच्या सरीत होळीच्या रंगात होळकर रंगुन गेले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी आणि मंगळवारी पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे पावसाच्या सरीत होळीसह धुळवड साजरी झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळाले.
कोकणात लोकप्रिय ठरलेला होलिकोत्सव सोमवारी रात्री पांरपारिक पध्दतीने साजरा करताना केळी,साखर,आंबा, नारळ, सुपारीच्या फाद्यांचे पूजन करण्यात आले. मुरुडमध्ये जवळच्या वाडीत जाऊन होळी आणून ती सजविणे यामध्ये लहान मुले,मुली कंपनीच्या पुढाकार महत्वाचा होता. शहर आणि पतिरसरात होळी पूजनाला सुवाासिनींची गर्दी होती. होळीला पुरणपोळीचा नैवद्य दाखविण्याला त्यानंतर शास्ञाप्रमाणे होळी प्रज्वलीत करण्यात आली. प्रत्येक गावाच्या व समाजा प्रमाणे तसेच प्रथेप्रमाणे होलिकोत्सव साजरा करण्यात आला.धुळवड होळी सणाचे खास असलेले धुळवड ही जरी दुसर्‍या दिवशी साजरी होत असली तरी तिची सुरुवात होळीच्या राञी करण्यात येते. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच बच्चेकंपनी होळीच्या रंगात रंगु लागले. मंगळवारी सकाळपासुनच गजबजणारे रस्ते गर्दीने फुलणारे नाके सारेच सुने सुने होते बाजारपेठ बंद होत्या वाहनाची रेलचेलही फारच तुरळक होती मात्र या सुन्या रस्त्यावर होळकरांचे घोळके वावरताना दिसत होते प्रत्येकाच्या हातात रंग पिचकार्‍या होत्या. ये-जा करणार्‍यांवर रंगाची उधळञ होत होती होळीच्या आनंदात सामावुन घेत होते. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी असे चित्र होते.

पाण्याच्या फवारणीसह रंगोत्सवचा आनंद
पेण: तालुक्यासह ग्रामीण भागात मंगळवारी धुळवड रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली परिसरातील युवकांनी पाण्याच्या फवारणीसह रंगोत्सवचा आनंद लुटला. ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी धुलीवंदन ज्या दिवशी त्याचदिवशी रंगपंचमी साजरी करण्यात येते. अधिकाधिक गावात प्रथेनुसार रंगपंचमी दिवशी उत्सव साजरा केला जातो. गावामध्ये होळीच्या पाचव्या दिवशी सुद्धा रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा आहे.मंगळवारी सकाळपासूनच युवकांनी गावामध्ये सप्तरंगाच्या उधळणीत संगीताच्या तालावर पाण्याच्या वर्षावात ठेका घरला होता. शालेय मुला-मुलींनीही एकत्रित येत रंगपंचमीचा आनंद लुटला तर तरुणीसह महिलांची संख्याही लक्षणीय होती. तालुक्यात ग्रामीण भागात कोणताच अनुचित प्रकार घडला नाही.
तालुकयातील गडब येथे शिमगोत्सव उत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. यात महिलांचे पारंपारिक नृत्य आणि विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते,तर धुळवडही उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पारंपारिक पध्दतीने ढोल ताशे वाजवुन रंगाची उधळण करण्यात आली. इको फ्रेंडली रंगाचा वापर करण्यात आला. तरुण, तरुणी, महिला तसेच वयोवृध्द नागरिकांनीही धुळवड सणाचा आनंद घेतला.

शिहूत बच्चे कंपनीने लुटला धुलिवनंदनचा आनंद
शिहू : मंगळवारी धुलिवंदन सण सर्वत्र साजजरा होत असताना शिहू परिसरातही तरुण मुले गटागटाने फिरून एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद घेत असतानाच बच्चे कंपनीही यात मागे नसल्याचे दिसून आले. अनेक लहान मुलांनी आपल्या मित्रांसह पिचकार्‍या आाणि कोरड्या रंगांची उधळण करीत धुलिवंदन साजरी केली. काही ठिकाणी धुलिवंदन साजरी करून एकत्रित जेवणाचा आनंदही घेण्यात आला. होळी आणि धुलिवंदन सर्व समाजातील लोक एकत्र येऊन सामाजिक स्तरावर एकीच्या भावनेतून उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

First Published on: March 7, 2023 10:12 PM
Exit mobile version