जेएनपीएत अधिकार्‍यांसाठी ‘ओरिएंटेशन प्रोग्राम’

जेएनपीएत अधिकार्‍यांसाठी ‘ओरिएंटेशन प्रोग्राम’

 

उरण: जेएनपीएने आपल्या प्रशिक्षण केंद्रात देशातील ’प्रमुख बंदरांतील अधिकार्‍यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम’ आयोजित केला असून या कार्यक्रमाचे उद्घाटन डीजी शिपिंगच्या माजी संचालक तथा भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलपति डॉ. मालिनी शंकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ,जेएनपीएचे सल्लागार राजीव सिन्हा, विविध क्षेत्रातील तज्ञ प्राध्यापक, सदस्य आणि भारतातील प्रमुख बंदरांमधील सहभागी अधिकारी उपस्थित होते. येत्या ९ डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करतील.
जेएनपीएद्वारे देशातील प्रमुख बंदरांतील अधिकार्‍यांसाठी आयोजित केलेला हा अशा प्रकारचा पहिलाच ओरिएंटेशन प्रोग्राम आहे. यासाठी बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांना बंदर अधिकार्यांसोबत आपले ज्ञान व कौशल्य सामायिक करण्यासाठी आमंत्रित केले आहे. देशातील बंदर क्षेत्रातील कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि त्यामध्ये प्रासंगिक आणि नवीन कार्यपद्धती आणण्यासाठी भारतातील सर्व प्रमुख बंदरांमधून अधिकारी या ओरिएंटेशन प्रोग्रामध्ये सहभागी झाले आहेत.

अतिशय स्तुत्य उपक्रम
जेएनपीएचा हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्या माध्यमातून देशातील विविध क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांच्या सोबत होणारी चर्चा आणि मार्गदर्शनाचा लाभ बंदर अधिकार्‍यांना चांगल्या दृष्टीकोनातून होईल तसेच यामुळे बंदर अधिकार्‍यांचे कौशल्य वाढवण्यास आणि त्यांना प्रासंगिक आणि नवीन कौशल्य प्राप्त करण्यास मदत होईल, असे मत भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलपति डॉ. मालिनी शंकर यांनी व्यक्त केले.महसूल मॉडेल, मालकी मॉडेल, बंदर क्षेत्रातील पीपीपी, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी इत्यादी विविध विषयांवर होणारी चर्चा सागरी उद्योगाच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.

सध्याच्या वेगवान कामाच्या वातावरणात समग्र ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन हा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. दोन आठवडे चालणार्‍या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये देशातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ आणिअनुभवी प्राध्यापक विविध विषयावर मार्गदर्शन तसेच बंदराच्या कामकाजाचे समग्र विहंगावलोकन करतील. या ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून बंदर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अद्ययावत ज्ञान प्राप्त करत राहण्याची आणि माहीती सामायिक करण्याची गरज पूर्ण होते.
– जेएनपीएचे अध्यक्ष श्री संजय सेठी,

First Published on: November 29, 2022 10:11 PM
Exit mobile version