माथेरानमध्ये पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

माथेरानमध्ये पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

माथेरान मध्ये पर्यटकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

माथेरान पर्यटनस्थळावर वर्षा सहलीसाठी आलेल्या अश्विन कोळी या तरूणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २३ तारखेला घडली आहे. सदर घटनेतील अश्विन कोळी आपली पत्नी चैताली व अन्य तीन मित्र वैभव सकपाळ, संजय सोलंकी आणि सुजाता सोलंकी यांच्यासोबत बुधवारी नालासोपारा येथून माथेरानला तीन दिवसांच्या पर्यटनासाठी आले हौते. हे पाचही जण एका खाजगी घरगुती लॉजमध्ये वास्तव्यास होते. गुरुवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास गप्पा मारत असताना अश्विनचे अचानक डोके दुखायला लागले. त्यानंतर हळूहळू त्याच्या उजव्या हाताला अर्धांगवायू झाल्यासारखे जाणवू लागल्यामुळे अश्विनने स्वतःला होणारा त्रास आपली पत्नी चैताली व मित्रांना सांगितला. यावेळी क्षणाचाही विलंब न करता मित्रांनी लॉज मालकाच्या मदतीने हात रिक्षाच्या साहाय्याने अश्विनला माथेरान मधील बि.जे.हॉस्पिटल येथे अॅडमिट करण्यात आले. यावेळी त्यांच्या तोंडाला फेस देखील आल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टर उदय तांबे यांनी अश्विनवर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र अवघ्या काही मिनिटांत अश्विनने अखेरचा श्वास घेतल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या सर्व प्रकारामुळे त्याचे सर्व नातेवाईक हादरले आहेत.

सदर घटनेतील अश्विनचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या उजव्या पायावर सर्पदंश झाल्यासारखे दातांचे निशाण आढळला. अश्विनला सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू ओढवला असू शकतो, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. सदर घटनेतील अश्विनचा मृतदेह कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, माथेरान पोलीस ठाण्यात मयत अश्विन कोळी याची अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.तर या घटनेचा अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र राठोड, प्रशांत गायकवाड करत आहेत.


हेही वाचा – ICSE, ISC Result 2021: यंदा ICSE दहावीचे ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ISC बारावीत ९९.७६ विद्यार्थी उत्तीर्ण

First Published on: July 24, 2021 6:44 PM
Exit mobile version