Ganesh Chaturthi Muhurat 2020: ‘या’ शुभवेळात करा आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना

Ganesh Chaturthi Muhurat 2020: ‘या’ शुभवेळात करा आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना

२२ ऑगस्ट रोजी भद्र शुक्ल चतुर्थीच्या दिवशी शनिवारी देशभरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या चतुर्थीला गणेश पुराणात विनायक चतुर्थी म्हणतात. भाद्रपण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी कैलासवर शिव पार्वतीचा पुत्र म्हणून भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या तपश्चर्येने गणेश प्रसन्न झाले, अशी एक आख्यायिका आहे. म्हणूनच या चतुर्थी तिथीला गणेशाची जयंती साजरी केली जाते.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने मोठ्या स्तरावर किंवा धामधुम करत गणेशोत्सव नेहमी सारखा उत्साहात साजरा होताना दिसणार नाहीये. असे असले तरी भाविक आपल्या घरात गणपती बाप्पाचे आगमन करणार आहेत. जाणून घ्य़ा आपल्या गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना करण्याची शुभ वेळ आणि मुहूर्त..

‘या’ शुभवेळात करा आपल्या बाप्पाची प्रतिष्ठापना 

गणेश स्थापना पूजन राहुकाळ :

शनिवारी गणेश चतुर्थीमुळे राहू कालावधी सकाळी 9 ते रात्री 10:30 पर्यंत राहणार आहे. गणेश मूर्तीची स्थापना आणि पूजा करण्यासाठी ही वेळ अनुकूल नसल्याचे सांगितले जात आहे.

गणेश चतुर्थी स्थापना पुजन शुभ मुहूर्त

21 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी 11 वाजून 4 मिनिटांनी सुरू होणार असून गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला 7 वाजून 58 मिनिटांनी संपणार आहे.

शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजून ५८ मिनिटांपासून ते रात्री 9.30 या वेळेत असणार आहे.

दुपारी 2 वाजूव 17 मिनिटांपासून ते 3 वाजून 52 मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त असणार आहे

दुपारी 3 वाजून 53 मिनिटांपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अमृत मुहूर्त असणार आहे.

 

First Published on: August 21, 2020 11:28 PM
Exit mobile version