आवेश खानची भेदक गोलंदाजी; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

आवेश खानची भेदक गोलंदाजी; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच टी-२० मालिकेमध्ये २-२ अशी बरोबरी केली. त्यामुळे आता मालिका विजयासाठी पुढील ५ वा आणि अखेरचा टी-२० सामना भारतीय संघाला जिंकणे बंधनकारक आहे. दरम्यान, काल झालेल्या या सामन्यात भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि अनुभवी दिनेश कार्तिक या दोन फलंदाजांनी उत्तम फलंदाजी केली. तसेच, आवेश खान या वेगवान गोलंदाजाने आफ्रिकेच्या फलंदाजांसमोर चेंडूंचा मारा करत त्यांना धाव संख्येपर्यंत पोहचू दिले नाही. त्यामुळे भारतीय संघाला चौथा सामना जिंकण्यात यश आले. (4th t20 india won the match by 82 runs against south africa)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथा टी २० सामना राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (saurashtra cricket association stadium) खेळवण्यात आला होता. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा असल्याने तो भारताने यशस्वीरीत्या जिंकला. त्यामुळे आता मालिकेत दोन्ही संघाचा स्कोर २-२ असून रविवार १९ जून होणाऱ्या अंतिम सामन्यात मालिकेचा रिझल्ट समोर येणार आहे.

हेही वाचा – इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ रवाना, बीसीसीआयकडून खास फोटो शेअर

नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी

या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गोलंदाजीही चांगली केली. ऋतुराज, अय्यर, पंत स्वस्तात बाद झाले. ईशानही २७ धावाच करु शकला. मात्र, त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने संघाचा डाव सावरला ३१ चेंडूत ४६ धावा ठोकल्या. तसेच, दिनेश कार्तिकने कारकिर्दीतील पहिले टी २० अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूत ५५ धावा केल्या. याशिवाय, अक्षर पटेलने चौकार ठोकत डाव संपवला. ज्यामुळे विजयासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर भारताने १७० धावांचे लक्ष्य ठेवले.

दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवातच खराब

भारताने दिलेले १७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवातच खराब झाली. त्याच्या एकाही खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. रासी डस्सेन याने केलेल्या २० धावा संपूर्ण संघातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक ठरल्या. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी सुरुच ठेवली. सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण आवेश खानने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकात १८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.


हेही वाचाइंग्लंडचा विश्वविक्रम, वनडे सामन्यात केल्या ४९८ धावा

First Published on: June 18, 2022 7:46 AM
Exit mobile version