इंग्लंडचा विश्वविक्रम, वनडे सामन्यात केल्या ४९८ धावा

इंग्लंड (england team) आणि नेदरलँड (netherlands) यांच्यात झालेल्या वनडे सामन्यात इग्लंडने ऐतिहास धावांचा डोगर रचला. एकूण ५० षटकात ४९८ धावा करण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या संघाने केला आहे. डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने वनडे (ODI) क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला.

इंग्लंड (england team) आणि नेदरलँड (netherlands) यांच्यात झालेल्या वनडे सामन्यात इग्लंडने ऐतिहास धावांचा डोगर रचला. एकूण ५० षटकात ४९८ धावा करण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या संघाने केला आहे. डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने वनडे (ODI) क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला. यामुळे नेदरलँड संघाला विजयासाठी तब्बल ४९९ धावांचे आव्हान दिले. (england team world records highest team score odi 498 runs against netherlands)

या सामन्यात नेदरलँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जेसन रॉय अवघ्या एका धावांवर माघारी परतला. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या डेविड मलान आणि फिल साल्ट यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी द्विशतकी भागिदारी केली. दोघांनी तब्बल २२३ धावांची भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. फिल साल्ट याने १२२ धावांची खेळी केली. तर डेविड मलान याने १२५ धावांची वादळी खेळी केली.

हेही वाचा – कसोटी सामन्यात इंग्लंडने टी-२० फॉर्म्युला वापरत न्यूझीलंडचा केला पराभव

जोस बटलर यानेही नेदरलँडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बटलरने ७० चेंडूत १६२ धावा केल्या. या खेळीरम्यान बटलरने तब्बल १४ षटकार आणि ७ चौकार मारले. बटलरशिवाय फिल साल्ट याने ९३ चेंडूत १२२ तर डेविड मलान याने १०९ चेंडूत १२५ धावांची खेळी केली. तसेच, लियाम लिव्हिंगस्टोन यानेही षटकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने फक्त २२ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान लियामने ६ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडला.

इंग्लंडच्या फलंदाजांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सर्वाधिक षटकार जोस बटलरने लगावले. नेदरलँडच्या एकाही गोलंदाजाला अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. प्रत्येक गोलंदाजाला प्रतिषटक आठ पेक्षा जास्त धावांनी चोप मिळाला. नेदरलँडकडून पिटर सीलार याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.


हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणार नीरज चोप्रा, AFI ने केली संघाची निवड