U19 World Cup: कॅनडा क्रिकेट टीमचे ९ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, २ सामने रद्द

U19 World Cup: कॅनडा क्रिकेट टीमचे ९ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, २ सामने रद्द

ICC Under 19 World Cup 2022 वर पु्हा एकदा कोरोनाचं सावट घोंघावत आहे. मागील काही दिवसांपूर्वी टीम इंडियातल्या अंडर-१९च्या सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता कॅनडा क्रिकेट टीमच्या ९ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे ९ खेळाडू पॉझिटिव्ह आल्यानंतर प्लेट इव्हेंटमधील २ सामने रद्द करण्यात आले आहेत.

२ सामने करावे लागले रद्द

कॅनडा टीममधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर कॅनडा टीमचा स्कॉटलंड विरूद्धचा सामना रद्द करण्यात आला. तर दुसरा सामना युगांडा अंडर-१९ आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार होता. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांसाठी ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये हे सामने रंगणार होते.

आयसीसीनं काय सांगितलं ?

कोरोनाचा संसर्ग झालेल्या खेळाडूंना आता क्वारंटाईन केलं जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलंय त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे, असं आयसीसीने सांगितलं आहे. २९ जानेवारी रोजी स्कॉटलँड विरूद्ध कॅनडाचा प्लेट प्ले-ऑफ सेमीफायनल सामना रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर खेळांच्या नियमांनुसार स्कॉटलंडची टीम १३ आणि १४ व्या प्ले ऑफसाठी पात्र ठरली आहे. तर १५ आणि १६ व्या स्थानासाठी कोणताही प्ले-ऑफ होणार नाहीये, अशा प्रकारचं निवदेन आयसीसीकडून जारी करण्यात आलं आहे.


हेही वाचा : Toyota Lunar Cruiser : Toyota बनवणार चंद्रावर धावणारी कार, जपान स्पेस एजन्सीसोबत करणार लॉन्च


 

First Published on: January 29, 2022 2:53 PM
Exit mobile version