घरताज्या घडामोडीToyota Lunar Cruiser : Toyota बनवणार चंद्रावर धावणारी कार, जपान स्पेस एजन्सीसोबत...

Toyota Lunar Cruiser : Toyota बनवणार चंद्रावर धावणारी कार, जपान स्पेस एजन्सीसोबत करणार लॉन्च

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून जपान स्पेस एजन्सीसोबत टोयोटा कंपनी चंद्रावर धावणाऱ्या कारची निर्मिती करत आहे. जपानची सुप्रसिद्ध कार निर्माता कंपनी टोयोटा आता चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कंपनी जपानच्या एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीसोबत (JAXA) मिळून काम करत आहे. या दशकाच्या अखेरीस लोकांना चंद्रावर आणि २०४० पर्यंत मंगळ ग्रहावर घेऊन जाण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. या कारला टोयोटा लुनार क्रूझरच्या नावाने ओळखलं जात आहे. हे नाव टोयोटा लँड क्रूझर एसयूव्हीवरून घेण्यात आलंय.

मानवी जीवनासाठी ठरणार मौल्यवान 

हे वाहन अंतराळात राहण्यायोग्य वातावरण प्रदान करू शकते. आम्ही अवकाशातील एका बदलाकडे एक पाऊल म्हणून पाहतोय. त्यामुळे अंतराळात जाऊन आम्ही दूरसंचार आणि इतर तंत्रज्ञान विकसीत करू शकतो जे मानवी जीवनासाठी मौल्यवान ठरेल, असं टोयोटा मोटर कॉर्पोरेशनमधील लुनार क्रूझर प्रकल्पाचे प्रमुख ताकाओ यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

लुनार क्रूझरमध्ये Gitai Japan Inc ने खास डिझाईन केलेले आणि विकसीत असे विशेष रोबोटिक शस्त्रे असणार आहे. यामध्ये विविध यंत्रांचा वापर केला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वाहनाची बांधणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दशकाच्या अखेरीस कार लॉन्च करणार

या प्रकल्पांतर्गत मानवाच्या मोहिमेसाठी प्रेशराइज्ड लुनार क्रुझर बनवलं जाणार आहे. हे वाहन चंद्राच्या पृष्ठ भागाचा शोध घेण्यासाठी आणि संशोधनासाठी काम करणार आहे. JAXA आणि Toyota यांनी जून २०१९ मध्ये क्रुझर तयार करण्यासाठी करार केला असून दशकाच्या अखेरीस वाहन लॉन्च करण्याची त्यांची मोहीम आहे.


हेही वाचा : IPL 2022 AUCTION : आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये Baby डिव्हिलियर्सवर कोटींचा वर्षाव होण्याची शक्यता, या संघातून खेळणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -