आमलाचा द.आफ्रिकेच्या संघात समावेश

आमलाचा द.आफ्रिकेच्या संघात समावेश

हाशिम आमला

मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आलेल्या अनुभवी हाशिम आमलाची विश्वचषकासाठी द.आफ्रिकेच्या संघात निवड झाली आहे. अष्टपैलू क्रिस मॉरीसला मात्र या संघात स्थान मिळाले नाही. आमलाच्या निवडीबाबत द.आफ्रिकेमध्ये बराच वादविवाद होता. एकेकाळी जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या आमलाने २०१८ च्या सुरुवातीपासून १६ डावांत ३५.२६ च्या सरासरीनेच धावा केल्या आहेत, ज्यात केवळ एका शतकाचा समावेश आहे. सध्या तो स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत आहे. मात्र, तिथेही त्याला धावांशी झुंजावे लागत आहे. त्याची ६ डावांत ३२ ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे त्याची विश्वचषकासाठी निवड होऊ नये, असे काहींचे मत होते. मात्र, तो खूप अनुभवी असल्याने त्याला संधी देण्यात आली आहे.

फॅफ डू प्लेसी या संघाचे नेतृत्त्व करणार असून, या संघात अनुभवी जेपी ड्युमिनी आणि डेल स्टेन यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच याआधी अवघे ४ एकदिवसीय सामने खेळलेल्या वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्टजेलाही या संघात स्थान मिळाले आहे. विश्वचषकात द.आफ्रिकेचा पहिला सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे. हा या विश्वचषकाचा सलामीचा सामना असणार आहे.

द.आफ्रिकन संघ – फॅफ डू प्लेसी (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जेपी ड्युमिनी, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी इंगिडी, एन्रिच नॉर्टजे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, डेल स्टेन, इम्रान ताहिर, रॅसी वन डर डूसेन.

First Published on: April 19, 2019 4:09 AM
Exit mobile version