आशिया चषकाचा सामना संपताच स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान प्रेक्षकांत रंगली फटकेबाजी

आशिया चषकाचा सामना संपताच स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान प्रेक्षकांत रंगली फटकेबाजी

आफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात अखेरच्या षटकात पाकिस्तानच्या नशीम शहा 2 षटकार मारत सामना जिंकवला. पाकिस्तानच्या विजयानंतर अफगाणिस्तानच्या अनेक खेळाडूंचे डोळे पाणावले. याच सामन्यानंतर एक लज्जास्पद घटना घडली, ती म्हणजे प्रेक्षक एकमेकांमध्ये भिडल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (angry afghanistan fans break chairs and attack pakistan fans in sharjah cricket stadium in asia cup 2022)

आफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यानंतर अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानच्या प्रेक्षकांना मैदानात तुफान मारहाण केली आहे. पाकिस्तानचे टीशर्ट घातलेल्या प्रेक्षकांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांना शोएब अख्तरने खडेबोल सुनावले आहेत.

या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत शोएब अख्तरने आफगाणिस्तानच्या चाहत्यांकडून अनेकदा असे कृत्य झाले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, ‘हा एक खेळ आहे, तो खेळला पाहिजे, त्याचबरोबर योग्य पद्धतीने खेळला पाहिजे. तुम्हाला या खेळात पुढे जायचे असल्यास तर खेळाडू आणि प्रेक्षकांना अनेक गोष्टी शिकाव्या लागतील’, असे शोएब अख्तर याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

रोमांचक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटने पराभव केला आहे. अफगाणिस्ताननं दिलेले 130 धावांचे आव्हान पाकिस्तानने अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केले. वेगवान गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. बुधवारी अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या अत्यंत रोमांचक सामन्यात संघाने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना निश्‍चित केला. अफगाणिस्तान संघाने इब्राहिम झद्रानच्या 35 आणि हजरतुल्ला झाझाईच्या 21 धावांच्या जोरावर 129 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत सामना शेवटपर्यंत खेचून आणला. पाकिस्तानकडून फजल फारुकी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले आणि 9 बळी घेतले. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती आणि नसीम शाहने सलग दोन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.


हेही वाचा – लज्जास्पद! पाकिस्तानच्या ‘या’ फलंदाजाने बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

First Published on: September 8, 2022 11:27 AM
Exit mobile version