अर्जुन तेंडुलकरने लॉर्ड्सवर काढले रेडिओ विकायला!

अर्जुन तेंडुलकरने लॉर्ड्सवर काढले रेडिओ विकायला!

सौजन्य - ट्विटर

भारताचा सध्या इंग्लंड दौरा सुरू असून संघातील खेळाडूंपेक्षा जास्त चर्चेत आहे तो भारताचा अंडर १९ संघातील खेळाडू आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. कधी इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनियलसोबतचा लंचवरील फोटो तर कधी पावसादरम्यान मैदानाची देखभाल करणाऱ्या ग्राउंड स्टाफची मदत करतानाचा अर्जुन आता पुन्हा चर्चेत आलाय तो आपल्या अजब कामामुळे! क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानाबाहेर अर्जुन चक्क रेडिओ विकत असून त्याचा रेडिओ विकतानाचा फोटो भारताचा खेळाडू हरभजन सिंगने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे.

काय आहे हरभजनचं ट्विट?

हरभजनने आपल्या ट्विटर हँडलवरून आपला आणि अर्जुनचा एक फोटो पोस्ट केला असून त्यात अर्जुन रेडिओ विकताना दिसून येत आहे. त्याचसोबत हरभजनने त्यात लिहिले आहे की, “ज्युनिअर सचिन तेंडुलकर लॉर्ड्स बाहेर रेडिओ विकतोय. आतापर्यंत ५० रेडिओ विकले आहेत. अजून काही रेडिओ शिल्लक असल्याने लवकरात लवकर खरेदी करा!”

वाचा – कोहलीला प्रपोज करणारी डॅनियल अर्जुन तेंडुलकरसोबत

अर्जुनने केली होती पावसात ग्राउंड स्टाफची मदत

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या मॅचमध्ये भारताला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. सध्या दुसरी टेस्ट मॅच लॉर्डसवर सुरू आहे. पहिल्याच दिवशी जेव्हा पावसाने मैदानावर हजेरी लावली तेव्हा सर्व ग्राउंड स्टाफची अक्षरश: तारांबळ उडाली. मैदानाची काळजी घेण्यासाठी ग्राउंड स्टाफ मैदानात आला आणि त्यांच्या मदतीला अर्जुनही धावून गेला. अर्जुनच्या या कामगिरीमुळे लॉर्ड्स मैदान कमिटीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून अर्जुनचे अभिनंदन देखील केले आहे.

सध्या दुसरी कसोटी सुरू असून सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने सामन्यात आपले वर्चस्व मिळवले आहे. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने २५० धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारताची फलंदाजी ढेपाळली असून भारताचा पहिला डाव १०७ धावांत आटोपल्यानंतर इंग्लंडने आता सामन्यात आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडला २५० धावांची आघाडी

First Published on: August 12, 2018 4:47 PM
Exit mobile version