जपानला पुन्हा पराभूत करत भारतीय हॉकी संघाने पटकावले कांस्य पदक

जपानला पुन्हा पराभूत करत भारतीय हॉकी संघाने पटकावले कांस्य पदक

आशिया कपमध्ये जपानचा पुन्हा 1-0 असा पराभव करत भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) कांस्य पदक (bronze medal) पटकावले आहे. मंगळवारी भारताने दक्षिण कोरियाविरोधातील झालेला सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे भारताचे अंतिम सामन्यातील आव्हान संपुष्टार आले होते. त्यामुळे भारताला आजचा कांस्य पदाकासाठीचा सामना जपानविरोधात खेळावा लागला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने उत्तम कामगिरी करत जपानचा पराभव केला.

कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यापूर्वी साखळी सामन्यातील पहिला सामन्यात भारतीय संघाचा जपानने पराभव केला होता. त्यावेळी जपानने 2-5 च्या फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर सुपर 4 मध्ये भारतीय संघाने 2-1 ने विजय मिळवला. त्यानंतर पन्हा एकदा कांस्य पदकासाठी खेळलेल्या सामन्यात भारताने जपानचा पराभव केला. भारताने 1-0 असा पराभव केला.

कांस्य पदाकाच्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळी केली. या सामन्याच्या पहिल्या सहा मिनिटांतच भारतीय संघाने गोल करत आघाडी घेतली होती. राजकुमारने जापानविरोधात पहिला आणि एकमेव गोल करत भारतीय संघाला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी भारताने पहिल्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत कायम ठेवली.

त्यानंतर दूसऱ्या क्वार्टरमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरच्या खेळातही एकही गोल जपानला झाला नाही. भारताने हा सामना 1-0 च्या फरकाने जिंकला. यासह या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदकावर नाव कोरले.


हेही वाचा – FIH World Rankings: भारतीय महिला हॉकी संघाने मारली बाजी; पुरुष संघाची घसरण

First Published on: June 1, 2022 5:18 PM
Exit mobile version