Asian Games 2018 : सौरभ चौधरीची सुवर्ण कामगिरी

Asian Games 2018 : सौरभ चौधरीची सुवर्ण कामगिरी

सौरभने मिळवला सुवर्णपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन्स गेम्समध्ये भारताच्या १६ वर्षीय नेमबाजपटू सौरभने सुवर्णपदक मिळवले आहे. तर अभिषेक वर्मानेही कांस्यपदकाची कमाई केली आहे. १० मीटर एयर पिस्टल प्रकारात भारताने ही अप्रतिम कामगिरी केली आहे.

अभिषेक वर्मालाही कांस्यपदक

सौरभने २४०.७ गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावे केले आहे. तर अभिषेक वर्माने २१९.३ गुणांसह कांस्यपदक मिळवले आहे. भारताला सौरभने स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले असून याआधी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनीही सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

सौजन्य – ट्विटर

सौरभवर सर्वच स्थरांतून शुभेच्छांचा वर्षाव

अवघ्या १६ वर्षाच्या वयात एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवण्याची अप्रतिम कामगिरी केलेल्या सौैरभवर सर्व स्थरांतून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. माजी खेळाडू, राजकीय पक्ष आणि अनेक मान्यवरांनी ट्विटरद्वारे सौरभला शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनव बिंद्रा


बीजेपी पक्ष युथ विंग 

राज्यवर्धनसिंह राठोर, क्रिडा मंत्री

मेजर सुरेंद्र पुनिया 


कॉंग्रेस पक्ष

First Published on: August 21, 2018 10:58 AM
Exit mobile version