भारताची शानदार कामगिरी, टेबल टेनिसमध्ये कांस्य पदकासह तीन पदकांची कमाई

भारताची शानदार कामगिरी, टेबल टेनिसमध्ये कांस्य पदकासह तीन पदकांची कमाई

भारतीय टेबल टेनिस खेळाडूंनी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२१ मध्ये इतिहास रचला आहे. कतारच्या दोहामध्ये सोमवारी भारताच्या टेबल टेनिस खेळाडूंच्या जोडीला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. दुहेरी स्पर्धेमध्ये सोमवारी खेळवण्यात आलेल्या सेमीफायनलमध्ये हरमीत देसाई आणि मानव ठक्करच्या जोडीला जगातिल २६ व्या रँकमधील वूजीन जैंग आणि जोंगहू लिमची दक्षिण कोरियाची जोडीकडून २-३ अशा फरकाने पराभव झाला आहे.

तसेच दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑलिम्पियन शरथ कमल आणि साथियानच्या जोडीला जगातील १४ व्या युकिया उदा आणि शुंसुके तोगामी या जपानी जोडीकडून ०-३ अशा फरकाने पराभव झेलावा लागला आहे.

भारताला विभक्त स्पर्धेत मात्र निराशा मिळाली आहे. शरथ कमलला क्वार्टरफायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या सांगसूने ०-३ ने पराभव केला आहे. तसेच सुनिल शेट्टी आणि ठक्करला अंतिम ३२ व्या फेरीत तसेच साथियानला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे.

महिलांच्या स्पर्धेतही भारताला निराशा मिळाली आहे. दुहेरी स्पर्धेत उपांत्य फेरीत सुतीर्थ-एहिकाच्या जोडीला पराभव झाला आहे. तसेच अर्चना कामथ, सुतीर्थ मुकर्जी, एहिका मुखर्जी आणि श्रीजा अकुलाला आपल्या आपल्या सामन्यात पराभूत झाल्या आहेत.


हेही वाचा : IND vs ENG: रोहित शर्मा म्हणतो, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे आम्हीच विजेते!


 

First Published on: October 4, 2021 7:29 PM
Exit mobile version