आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा

आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा

जेरेमी लालरिनुंगाची युवा जागतिक विक्रमाला गवसणी

युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जेरेमी लालरिनुंगाने रविवारी तीन जागतिक विक्रम आपल्या नावे करत आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये दुसरे स्थान मिळवले. १६ वर्षीय जेरेमी ६७ किलो वजनी गटामध्ये स्नॅच, क्लीन आणि जर्क मिळून २९७ किलो (१३४+१६३) वजन उचलत युवा जागतिक व आशियाई विक्रम केला. मात्र, त्याला पहिला क्रमांक मिळवता आला नाही. ‘ब’ गटातच असणार्‍या पाकिस्तानच्या तल्हा तलिबने एकूण ३०४ किलो (१४०+१६४) वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला. ६७ किलो वजनी गटातील अंतिम निकाल सोमवारी ‘अ’ गटातील स्पर्धा पूर्ण झाल्यावरच होईल.

जेरेमीने या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून एकूण १५ विक्रम आपल्या नावे केले. त्याने ६ आंतरराष्ट्रीय (३ युवा जागतिक आणि ३ युवा आशियाई) तर ९ राष्ट्रीय (३ युवा राष्ट्रीय, ३ ज्युनियर राष्ट्रीय, ३ सिनियर राष्ट्रीय) विक्रम आपल्या नावे केले.

या स्पर्धेत त्याने स्नॅचमधील पहिल्या ३ पैकी २ प्रयत्नात यशस्वीपणे वजन (१३०, १३४ किलो) उचलत नवा युवा जागतिक विक्रमाला गवसणी घातली. हा विक्रम याआधी जेरेमीच्याच नावे होता. त्यानंतर त्याने क्लीन आणि जर्कमधील पहिल्या २ प्रयत्नात यशस्वीपणे वजन (१५७, १६३ किलो) उचलत युवावा जागतिक विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम कझाकिस्तानच्या वेटलिफ्टरच्या नावे होता. त्याने १६१ किलो वजन उचलले होते. ही स्पर्धा २०२० ऑलिम्पिक पात्रतेसाठी महत्त्वाची आहे. जेरेमीने मागील वर्षी ब्यूनस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

First Published on: April 22, 2019 4:14 AM
Exit mobile version