अन् थोडक्यात अनर्थ टळला; ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात येताच कोसळला स्टँड

अन् थोडक्यात अनर्थ टळला; ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात येताच कोसळला स्टँड

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. गॉलमध्ये सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी वादळीवाऱ्यांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एक स्टण्ड देखील कोसळून पडला. मात्र हा स्टॅण्ड ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात दाखल झाल्यानंतर दाखल झाल्यानंतर कोसळला.

गॉलच्या मैदानातील हे तात्पुरते उभारण्यात आलेले स्टँड होते. सुदैवाची बाब म्हणजे हा अपघात झाला त्यावेळी तिथे कोणताही प्रेक्षक नव्हता. त्यामुळे या अपघातामध्ये कुणीही जखमी झाले नाही. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गॉल कसोटीच्या पहिल्या दिवशी १३ विकेट्स पडल्या आहेत. त्यामुळे ही कसोटी निकाली लागण्याची पूर्ण शक्यता आहे. यजमान श्रीलंकेचा पहिला डाव २१२ रनवर संपुष्टात आली. निशान डिकवेलानं सातव्या नंबरवर बॅटींगला येत झुंजार ५८ धावांची खेळी केली. एंजलो मॅथ्यूजनं ३९ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऑफ स्पिनर नॅथन लायन यांनी ९० धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर मिचेल स्वेपसननंही ३ विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाची सुरूवात देखील चांगली झाली नाही. पहिल्या दिवशी त्यांनी तीन विकेट्स झटपट गमावल्या. डेव्हिड वॉर्नर (David Warner) २५ धावांवर बाद झाला. स्टीव्ह स्मिथ फक्त 6 रन काढून परतला तर लाबुशेनलाही 13 धावा करता आल्या.


हेही वाचा – ठाकरेंच्या शेवटच्या कॅबिनेटमधील निर्णय अवैध, पण तरीही सहमत- फडणवीस

First Published on: June 30, 2022 6:45 PM
Exit mobile version