मार्कस स्टॉयनिसची तुफानी खेळी; टी-20 विश्वचषकात ठोकलं सर्वात जलद अर्धशतक

मार्कस स्टॉयनिसची तुफानी खेळी; टी-20 विश्वचषकात ठोकलं सर्वात जलद अर्धशतक

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट ठेवून श्रीलंकेवर दमदार विजय मिळवला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. मार्कस स्टॉयनिसने केवळ 17 चेंडूत अर्धशतक ठोकले. या तुफानी खेळीमुळे मार्कस स्टॉयनिसच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याच्यानंतर टी-20 विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा मार्कस स्टॉयनिस पहिला खेळाडू ठरला आहे. (Australia Marcus stoinis joint second fastest fifty in the mens t20 world cup)

2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध युवराज सिंहने 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर आज झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 विश्वचषकात मार्कस स्टॉयनिसने जलद अर्धशतक केले. दरम्यान, सर्वात वेगवान अर्धशतकाच्या यादीत भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज युवराज सिंह अजूनही टॉपवर आहे.

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने निर्धारित 20 षटकात 157 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 7 विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण केले.


हेही वाचा – …तर भारताला विश्वचषक जिंकणं अशक्य; पाकिस्तानच्या इंझमामने मांडले वेगळेच गणित

First Published on: October 25, 2022 9:55 PM
Exit mobile version