ऑस्ट्रेलियन कॉमेंटटेरने या भारतीय फलंदाजाचा केला अपमान

ऑस्ट्रेलियन कॉमेंटटेरने या भारतीय फलंदाजाचा केला अपमान

ऑस्ट्रेलियन समालोचक केरी ओ'किफने केला भारतीय फलदांजाचा अपमान

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर आणि आता प्रसारक असलेल्या केरी ओ’किफ याने एका भारतीय फलदांजावर आक्षेपार्ह टिप्पणी करुन वाद ओढवून घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतात क्रिकेटला मोठे स्थान आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर हे भारतीय खेळांडूचा नेहमीच तिरस्कार करताना आपण पाहीले आहे. मात्र केरी ओ’किफने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटीचे समालोचन करताना सर्व सीमा पार केल्या आहेत. आज तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस असून भारतीय फलदांजानी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला.

मेलबर्न येथे आज तिसरी कसोटी होत आहे. आज मयांक अग्रवाल हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. हनुमा विहारी सोबत मयांक अग्रवाल सलामीसाठी फलंदाजीला उतरला आणि त्याने ७६ धावांची खेळी केली. पहिल्याच सामान्यात दमदार खेळी केल्याबद्दल एकाबाजुला मयांकचे कौतुक होत आहे. मात्र दुसऱ्या बाजुला ऑस्ट्रेलियन कॉमेंटटेटर केरीने गरळ ओकत मयांकसोबत सर्व भारतीयांचा अपमान केला आहे. मयांक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पन करण्यापूर्वी अनेक वर्ष भारतात फर्स्ट क्लास क्रिकेट खेळत होता. यावेळी त्याने एका सामन्यात नाबाद ३०४ धावांची खेळी केली होती. मात्र केरी ओकिफला त्याचे हे यश पाहावले नाही. केरी म्हणाला की, “मयांकने ही खेळी हॉटेलच्या वेटर्सविरोधात” केली होती.

वाचा – IND vs AUS third test : टीम इंडियाला गरज धावांची; तिसरा कसोटी सामना आजपासून

मार्क वा’नेही उडवली खिल्ली, नंतर दिलगीरी

फक्त केरी ओकिफच नाही तर त्याच्यासोबत समालोचनासाठी बसलेल्या मार्क वॉने देखील मयांकचा अपमान केला. तो म्हणाला की, भारतीय खेळाडू जर घरच्या मैदानावर जर सरासरी ५० धावा करत असतील तर ऑस्ट्रेलियात त्या ४० धावांच्या बरोबरीच्या आहेत. केरी ओकिफच्या वक्तव्याची सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर एकच गदारोळ उडाला. त्यानंतर मार्क वॉने ट्विट करत सारवासारव केली. माझ्या वक्तव्याचा उद्देश भारतीय खेळांडूचा अवमान करणे नसल्याचा दावा त्याने केला.

हे देखील वाचा – मी कोण आहे हे जगाला सांगायची गरज नाही ! – विराट कोहली

मयांकची आतापर्यंतची कारकिर्द

२७ वर्षीय मयांक अग्रवालने ४९ प्रथम दर्जाचे क्रिकेट सामने खेळला आहे. यामध्ये त्याच्या धावांची सरासरी ही ४९.९५ असून एकूण धावा ३५९९ आहे. ज्यामध्ये एक त्रिशतक, ८ शतक सामील आहेत. तसेच घरच्या मैदानावर वनडे खेळताना ७५ सामन्यात ३६०५ धावा केल्या आहेत. ज्यात १२ शतके ठोकलेली आहेत. २०१७-१८ या वर्षात विजय हजारे चषकात आठ सामने खेळताना मयांकने ९०.३७ या सरासरीने ७२३ धावा केल्या होत्या. विजय हजारे चषकात आतापर्यंत असा विक्रम करणारा मयांक एकमेव खेळाडू आहे.

First Published on: December 26, 2018 5:58 PM
Exit mobile version