Australian Open Final : मेदवेदेवची पहिल्या दोन सेटमध्ये नदालवर मात, ग्रँड स्लॅम दुसऱ्यांदा जिंकण्याच्या तयारीत

Australian Open Final : मेदवेदेवची पहिल्या दोन सेटमध्ये नदालवर मात, ग्रँड स्लॅम दुसऱ्यांदा जिंकण्याच्या तयारीत

Australian Open Final : मेदवेदेवची पहिल्या दोन सेटमध्ये नदालवर मात, ग्रँड स्लॅम दुसऱ्यांदा जिंकण्याच्या तयारीत

वर्षाच्या पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुरुषांच्या एकेरी वर्गात राफेल नदाल आणि मेदवेदेवमध्ये स्पर्धा घेण्यात आली. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर मेदवेदेवला दुसरा सेट जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु नंतर रशियाच्या खेळाडूने जोरदार पुनरागमन करत ६-६ अशी बरोबरी केली आहे. मात्र शेवटच्या वेळी चांगल्या प्रकारे खेळी दाखवली आणि दुसऱ्या सेटमध्ये ७-७, ६.५ अशा फरकाने विजय मिळवला आहे.

अंतिम सामन्यात रशियाच्या मेदवेदेवने चांगली कामगिरी करत सुरुवात केले. नदालला ६-२ अशा फरकाने पराभूत केलं आहे. तसेच उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर अंतिम सामन्यात मेदवेदेवने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पहिल्या सेटमध्ये मेदवेदेवने राफेल नदालपेक्षा चांगली खेळी केली. तसेच सामन्याच्या सुरुवातीपासूनच नदालकडे मेदवेदेवच्या खेळीचे काही उत्तर नव्हते.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपनच्या अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना मेदवेदेवसोबत झाला होता. जोकोविचला हा सामना आपल्या नावे करुन ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू व्हायचे होते परंतु मेदवेदेवने तसं होऊ दिले नाही. मेदवेदेवने जोकोविचला आपल्या स्वप्नापासून दूर ठेवत कारकिर्दीतील पहिला ग्रँडस्लॅम जिंकला आहे. यानंतर आता राफेल नदालचीही जोकोविचसारखीच अवस्था झाली आहे. त्याला ऑस्ट्रेलिय ओपन जिंकणाला पहिला खेळाडू व्हायचे होते आहे. ज्यांनी २१ वेळा ग्रँड स्लॅम जिंकला आहे त्यांचाही सामना अंतिम फेरीत मेदवेदेवसोबत होणार आहे. रशियन खेळाडूला नदालचे स्वप्न भंग करुन दुसरे ग्रँडस्लॅम जिंकायचे आहे.

मेदवेदव आणि नदाल यांच्यात ४ सामने झाले. यामधील ३ नदाल तर १ मेदवेदेवने जिंकला आहे. नदालच्या तीन विजयामधील एक २०१९ ऑस्ट्रेलिया ओपन फायनलमधला आहे. परंतु यूएस ओपच्या अंतिम फेरीत मेदवेदेवचा पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर पुनरागमन केलं होते. परंतु पाचव्या सेटमध्ये पराभव झाला होता.

महिलांमध्ये किताब बारबोरा आणि कटरीनाच्या नावे

महिला जोडीमध्ये बारबोला आणि कटरीनाने किताब आपल्या नावे केला आहे. त्यांनी अंतिम सामन्यात डैनिलिना आणि हडाडच्या जोडीला तीन सेटमध्ये पराभूत केलं. पहिला सेट ६-७ अशा फरकाने गमावल्यानंतर या जोडीने शानदार पुनरागमन करत उर्वरित दोन्ही सेट जिंकून किताब आपल्या नावे केला आहे. कटरीना आणि बारबोरा जोडीने दुसरा आणि तिसरा सेट ६-४ अशा फरकाने जिंकला आहे. महिला एकेरीमध्ये एश्ले बार्टीने पहिला किताब जिंकला आहे.


हेही वाचा : Australian Open 2022 : Ashleigh Barty ने रचला इतिहास, ४४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

First Published on: January 30, 2022 5:58 PM
Exit mobile version