AUSW vs SAW : ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५ विकेट राखून विजय, कर्णधार लॅनिंगने झळकावले शतक

AUSW vs SAW : ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५ विकेट राखून विजय, कर्णधार लॅनिंगने झळकावले शतक

AUSW vs SAW : ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५ विकेट राखून विजय, कर्णधार लॅनिंगने झळकावले शतक

कर्णधार मेग लॅनिंगच्या नाबाद १३५ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने विश्व चषकात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन आपले विजय अभियान सुरुच ठेवले आहे. ६ वेळा चॅम्पियन राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने मंगळवारी आपला विजय कायम ठेवून सहाव्यांदा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला आतापर्यंत एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही.

लॅनिंगने वनडेमध्ये आपले १५ वे शतक पूर्ण केले आहे. १३० चेंडूमध्ये १५ चौकार आणि १ षटकार मारला. विश्व चषकामध्ये लॅनिंगचे हे तिसरे शतक आहे. ऑस्ट्रेलियाने लॅनिंगच्या खेळीमुळे ५ विकेटवर २७२ धावा करुन सामना जिंकला. वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजी करण्याची संधी दिली. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ५ विकेटवर २७१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लौरा वोलवार्टने १३४ चेंडूत ९० धावा केल्या आहेत. तर कर्णधार सुन लुसने आणखी एक अर्धशतक केले आहे.

दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर फलंदाज वोलवार्टने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आहे. वोलवार्टने लिजेल ली सोबत पहिला विकेटसाठी ८८ धावा केल्या आहेत. तर यानंतर लुससोबत ९१ धावांची भागीदारी केली. मारिजान कॅपने नाबाद ३० धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेने दिलेले आव्हान संपुष्टात आणताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाने ४५ धावा झाल्यानंतर आपली सलामीची जोडीचे विकेट गमावले. सलामीवीर अॅलिसा तिसऱ्या षटकात तर रॅचेल हेन्स ११ व्या षटकामध्ये बाद झाली. यानंतर लॅनिंगने बेथ मुनीसोबत २१ तर ताहिला मॅकग्रा सोबत ९३ धावा केल्या आहेत. एशलीग गार्डनर २२ एनाबेल सदरलॅंड नाबाद २२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या लिएशबनीम इस्माइल आणि स्पिनर चोले ट्रायोगने दोन-दोन विकेट घेतले आहेत.

ऑस्ट्रेलियाने या विजयासह आपले स्थान गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर मजबूत केले आहे. त्यांचे ६ सामन्यात १२ अंक आहेत. आता शेवटचा सामना बांग्लादेशसोबत खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका ही मालिका यापूर्वीच पारभूत झाली आहे. ते पाच सामन्यात ८ अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे.


हेही वाचा : भारताकडून बांगलादेशचा दारुण पराभव, गुणतालिकेत गरुड झेप, उपांत्य फेरीत जाण्याची तयारी

First Published on: March 22, 2022 5:29 PM
Exit mobile version