ICC Women’s T20 WC: 2023 मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी बांगलादेश आणि आयर्लंडचा महिला संघ ठरला पात्र

ICC Women’s T20 WC: 2023 मध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी बांगलादेश आणि आयर्लंडचा महिला संघ ठरला पात्र

बांगलादेश आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघांनी अबूधाबी येथील पात्रता स्पर्धेतील उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत 2023 मध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघ पात्र ठरले आहेत. बांगलादेशच्या महिला संघाने थायलंडवर 11 धावांनी विजय मिळवला होता. तर आयर्लंडने झिम्बाब्वेचा 4 धावांनी पराभव केला होता.

अशाप्रकारे दोन्ही संघांनी उत्तम कामगिरी केल्यानंतर या संघांचा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच या संघांनी 10 संघांच्या स्पर्धेसाठी आधीच आपली जागा निश्चित केली आहे.

बांगलादेश संघाची कर्णधार निगार सुल्ताना जॉटी म्हणाली की, आम्ही येथे T20 विश्वचषकाच्या पात्रतेसाठी आलो होतो आणि आम्ही करून दाखवलं. आम्ही इतकी वर्षे एकत्र खेळत आहोत. आम्ही किती चांगले खेळतो आणि एक संघ म्हणून आम्ही किती सुधारणा केल्या आहेत. हे जगाला दाखवण्याची ही आमची संधी होती, असं निगार सुल्ताना जॉटी म्हणाली.


हेही वाचा : Ind vs Aus: क्रिकेट सामन्यातही ’50 खोके, एकदम ओके’; सामन्यावेळी शिवसैनिकांची पोस्टरबाजी


 

First Published on: September 25, 2022 5:17 PM
Exit mobile version