करोनामुळे IPL रद्द होणार? BCCI ने केली भूमिका स्पष्ट

करोनामुळे IPL रद्द होणार? BCCI ने केली भूमिका स्पष्ट

करोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. अनेक मोठे कार्यक्रम करोनाच्या भीतीमुळे रद्द करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परेशी दौरे देखील रद्द करण्यात आले. करोनाचे सावट आता IPL वर आहे. करोनाच्या भीतीने अनेक परदेशी खेळाडू IPL मधून माघार घेणार असल्याची चर्चा आहे. करोनाचे सावट IPL वर असताना IPL स्पर्धा पुढे ढकलणार का? असा प्रश्न BCCIला विचारण्यात आला. यावर BCCIने आपली भूमिका सपष्ट केली आहे.


हेही वाचा – करोनाला रोखण्यासाठी डॉक्टरांची ‘करोना कमांडो टीम’ तैनात

IPL स्पर्धेचे आयोजन मार्चच्या अखेरीस करण्यात आले आहे. त्यामुळे IPL सुरु व्हायला अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे आताच्या घडीला IPL स्पर्धा पुढे ढकलण्याचा कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. सद्यस्थितीत आजूबाजूच्या भागात जे काही चालू आहे त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. स्पर्धेला करोनाचा फटका बसू नये यासाठी IPL व्यवस्थापनाकडून योग्य ती पूर्वकाळजी घेतली जात असल्याचे BCCI च्या सुत्रांनी सांगितले.

करोनामुळे जगभरात ३५०० हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाचे सावट ऑलिम्पिकवर देखील आहे. भारतातील करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे IPL ला देखील याचा फटका बसू शकतो.

 

First Published on: March 9, 2020 3:09 PM
Exit mobile version