इंग्लंडला विश्वविजेता होण्यासाठी बटलरचा फॉर्म महत्त्वाचा !

इंग्लंडला विश्वविजेता होण्यासाठी बटलरचा फॉर्म महत्त्वाचा !

जॉस बटलरची मागणी

इंग्लंडमध्ये मे महिन्यात सुरू होणार्‍या क्रिकेट विश्वचषकाचे इंग्लंड आणि भारत या दोन संघांना प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, यष्टीरक्षक-फलंदाज जॉस बटलर फॉर्मात असेल, तर त्याने खूप फरक पडेल, असे मत इंग्लंडचा माजी खेळाडू मार्कस ट्रेस्कोथिकने व्यक्त केले. बटलरने मागील काही काळात खूपच चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने मागील महिन्यातच वेस्ट इंडिजविरुद्ध अवघ्या ७७ चेंडूंत १५० धावांची खेळी केली होती.

जॉस बटलरची वेस्ट इंडिजविरुद्धची ती खेळी खूपच उत्कृष्ट होती. एखादा फलंदाज अशाप्रकारे खेळू शकतो यावर कधीतरी विश्वासच बसत नाही. बटलर सध्या खूप चांगल्या फॉर्मात आहे. तो क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात, कोणत्याही संघाविरुद्ध चांगली कामगिरी करत आहे. जर बटलरने त्याचा फॉर्म विश्वचषकातही सुरू ठेवला, तर त्याने खूप फरक पडेल.

माझ्यामते इंग्लंड किंवा भारत हा विश्वचषक जिंकेल. हे दोन संघ एकदिवसीय क्रमवारीतही पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकावर आहेत. इंग्लंडला घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची याच्यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही, असे ट्रेस्कोथिक म्हणाला.

First Published on: March 13, 2019 4:18 AM
Exit mobile version