रोहित शर्माची सीबीआय चौकशी करा; BCCI वरही गंभीर आरोप

रोहित शर्माची सीबीआय चौकशी करा; BCCI वरही गंभीर आरोप

भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला आगामी ऑस्ट्रलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. पायाचे स्नायू दुखावल्यामुळे रोहित शर्मा IPL मध्ये काही सामने खेळला नव्हता. त्या दरम्यानच्या काळात आस्ट्रलिया दौऱ्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंची निवड करण्यात आली. यातून रोहित शर्माला जायबंदी असल्यामुळे तिन्ही संघातून वगळण्यात आले. मात्र, रोहित शर्मा त्याच संध्याकाळी मुंबई इंडियन्ससाठी सराव करताना दिसला. रोहित शर्माला नेमकी कोणती दुखापत झाली हे काणालाच माहिती नाही आहे. सर्वजण तर्कवितर्क लावत आहेत. यामुळे आता चाहते रोहितच्या दुखापतीची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी करत आहेत.

आयपीएल नंतर भारताचा आस्ट्रलिया दौरा आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. यातून रोहितला वगळण्यात आले. मात्र, त्याच दिवशी रोहित सरवा करताना दिसला. त्यानंतर रोहित हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला. यावरुन चाहत्यांनी बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. रोहित मैदानावर उतरल्याने रोहितची दुखापत गंभीर नसून तो पूर्णपणे बरा झाल्याचे स्पष्ट झाले, तरीदेखील रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड का झाली नाही? असा सवाल चाहते उपस्थित करु लागले आहेत.

रोहितची संघात का निवड करण्यात आली नाही, यावरुन माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर, माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग यांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत. रोहित हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळला त्यामुळे रोहित फिट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत राजकारण केले जात असल्याची शंका आता चाहते घेत आहेत.

First Published on: November 5, 2020 2:19 PM
Exit mobile version