चेंडूच्या आघाताने टीम इंडियाचा क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, मैदानातच बोलावावी लागली अ‍ॅम्ब्युलन्स

चेंडूच्या आघाताने टीम इंडियाचा क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, मैदानातच बोलावावी लागली अ‍ॅम्ब्युलन्स

टीम इंडियाचा क्रिकेटपटू आणि ऑलराऊंडर वेंकटेश अय्यरबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वेंकटेश अय्यर मैदानात खेळत असताना त्याच्या मानेला चेंडू लागला आणि तो जमिनीवर कोसळला. चेंडूच्या आघाताने वेंकटेश मैदानात कोसळला. वेंकटेश कोसळल्यानंतर त्याच्यासाठी त्वरीत अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

दुलीप ट्रॉफीचा सामना मैदानात सुरू होता. कोइम्बतूर एसएनआर कॉलेजच्या क्रिकेट ग्राऊंडवर सामना सुरु आहे.
वेस्ट झोन आणि सेंट्रल झोनमध्ये सामना सुरु आहे आणि वेंकटेश सेंट्रल झोनकडून खेळत आहे. परंतु सामन्यात गोलंदाज चिंतन गाजाने चेंडू थ्रो केल्यानंतर अय्यरच्या मानेवर जाऊन आदळला. अय्यरने चेंडू लागल्यानंतर लगेच आपलं हेल्मेट काढलं. परंतु चेंडू लागल्यानंतर तो मैदानात कोसळला. मैदानावरील दुसरे खेळाडू त्याच्या मदतीसाठी पोहोचले. त्यानंतर मेडिकल टीम लगेच उपचारासाठी तिथे पोहोचली.

वेंकटेशची स्थिती पाहून मैदानातच अ‍ॅम्ब्युलन्स बोलावण्यात आली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवाने वेंकटेशला कुठलीही गंभीर दुखापत झाली नसून तो पुन्हा मैदानावर खेळण्यासाठी आला.

दरम्यान, सात विकेट्स पडल्यानंतर त्याने कॅप्टन करन शर्मासोबत फलंदाजी करण्यास सुरूवात केली. अय्यरने दोन चौकार मारले. वेंकटेश अय्यरने 14 धावा केल्या आणि सेंट्रल झोनचा पहिला डाव 128 धावात आटोपला.


हेही वाचा : बीसीसीआयचा मोठा निर्णय; भारतीय A संघाच्या कर्णधारपदी निवड


 

First Published on: September 16, 2022 10:07 PM
Exit mobile version