वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्रवेशावर ख्रिस गेलचं मोठं वक्तव्य

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्रवेशावर ख्रिस गेलचं मोठं वक्तव्य

टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या प्रवेशावर वेस्ट इंडिजचा युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यात आमनेसामने येतील, असं ख्रिस गेलने म्हटलं आहे. गेलने एका वृत्तपत्राशी संवाद साधला. त्यावेळी त्याने संवाद साधताना भविष्यवाणी केली. टीम इंडिया वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाणार नाही, असं भाकित ख्रिस गेलने केलं आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी कशी असेल?, असा प्रश्न गेलला विचारण्यात आला होता. तेव्हा तो म्हणाला की, भारत टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचा दावेदार आहे, पण वेस्ट इंडिजकडे भारतापेक्षा जास्त संधी आहे. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात अंतिम सामना होईल, असा अंदाज गेलने वर्तवला आहे.

ख्रिस गेल यावेळी वेस्ट इंडिजच्या टी-२० वर्ल्डकप संघाचा भाग नाहीये. गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपपासून तो विंडीज संघातून बाहेर आहे. गतवर्षी तुलनेत त्याने काहीही अशी विशेष कामगिरी केली नाही. आंद्रे रसेलही गेल्या टी-२० वर्ल्डकपपासून वेस्ट इंडिजकडून खेळलेला नाहीये. मात्र, दोघांनीही अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाहीये.

वेस्ट इंडिजचा संघ निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली टी-२० वर्ल्डकप खेळणार आहे. गेल, ब्राव्हो आणि रसेलसारखे या विश्वचषकात नाहीत. पण वेस्ट इंडिजकडे एकाहून एक तगडे टी-२० स्पेशालिस्ट खेळाडू आहेत.


हेही वाचा : भारतासाठी ‘करो या मरो’ सामना; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ‘वनडे’साठी संभाव्य संघ


 

First Published on: October 10, 2022 3:11 PM
Exit mobile version