भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक; हरमनप्रीत सिंगची तुफानी खेळी

भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक; हरमनप्रीत सिंगची तुफानी खेळी

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. प्रतिस्पर्धकांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. अशातच भारतीय हॉकी पुरष संघांने उत्तम खेळी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘पूल बी’च्या अखेरच्या सामन्यात वेल्सचा ४-१ असा पराभव केला. भारताच्यावतीने हरमनप्रीत सिंगने तीन गोल नोंदवले.

हरमनप्रीत आणि गुरजंत सिंग यांनी अखेरच्या दोन क्वार्टरमध्ये प्रत्येकी एक गोल केला. त्यामुळे भारत ४-० असा आघाडीवर होता. दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या सामन्यात घानाचा ११-० आणि तिसऱ्या सामन्यात कॅनडाचा ८-० असा पराभव केला होता. तसेच, इंग्लंडसोबतच्या सामन्यात ४-४ अशी बरोबरी साधली होती.

दरम्यान, या विजयासह भारतीय संघ सलग चौथ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हरमनप्रीतने दोन पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये रूपांतरीत करून दुसऱ्या क्वार्टरच्या हाफ टाईमला भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.


हेही वाचा – Commonwealth Games 2022 : पाच सुवर्ण पदके जिंकूनही भारत पदकतालिकेत सातव्या स्थानी

First Published on: August 4, 2022 10:43 PM
Exit mobile version