IPL 2022 : धोनी पुढची आयपीएल खेळणार?, त्यानेच दिली माहिती म्हणाला…

IPL 2022 : धोनी पुढची आयपीएल खेळणार?, त्यानेच दिली माहिती म्हणाला…

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम.एस धोनी पुढच्या वर्षी देखील आयपीएल खेळणार का याबाबत क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली असतानाच खुद्द धोनीने याबाबत भाष्य केले आहे. आयपीएल २०२२ ला अजून खूप वेळ आहे आणि पुढील वर्षाच्या आयपीएलमध्ये मी खेळणार की नाही यावर अद्याप मी काही सांगू शकत नाही असे धोनीने सांगितले. चेन्नईतील एका कार्यक्रमात बोलताना धोनीने सांगितले की, आता नोव्हेंबरचा महिना सुरू आहे आणि आयपीएल पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये होणार आहे. त्यामुळे याबाबतीत निर्णय घेण्यासाठी खूप वेळ आहे.

चेन्नईने आयपीएल २०२१ चा किताब जिंकल्यानंतर धोनी सारखा चर्चेत राहिला आहे आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो पुढच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही. आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या २ नवीन संघाचा समावेश होणार आहे त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या हंगामात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे धोनीने सांगितले की मी अद्यापही यावर कोणता निर्णय घेतला नाही म्हणूनच धोनी पुढच्या हंगामात देखील खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेन्नईला चांगला संघ बनवणे गरजेचे

धोनीने म्हटले, “हे बीसीसीआयवर अवलंबून आहे, असे मी याआधी सांगितले आहे. दोन नवीन संघ आल्यामुळे चेन्नईचा संघ कसा चांगला बनेल यावर विचार केला पाहिजे. संघातील पहिल्या ३-४ खेळांडूमध्ये माझे असणे जरूरी नाही तर संघासाठी मजबूत खेळाडूंची साखळी बनवण्याची गरज आहे. त्यामुळे फ्रँचायझीला अडचण येणार नाही. कोअर ग्रुपसाठी कोणते खेळाडू पुढील १० वर्षे संघासाठी योगदान देऊ शकतात हे पाहावे लागेल”. तर धोनीला विचारण्यात आले की, तू जो वारसा सोडत आहे त्याचा तुला अभिमान आहे का तेव्हा तो म्हणाला की तो वारसा मी अद्यापही सोडलेला नाही.


हे ही वाचा: पाकिस्तानच्या हसन अलीला icc कडून मोठी शिक्षा; बांगलादेशविरूध्दच्या सामन्यातील प्रकरण भोवले


 

First Published on: November 20, 2021 7:27 PM
Exit mobile version