पाकिस्तानच्या हसन अलीला icc कडून मोठी शिक्षा; बांगलादेशविरूध्दच्या सामन्यातील प्रकरण भोवले

बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान फलंदाजाला बाद केल्यानंतर केलेल्या वर्तवणुकीवरून हसन अली अडचणीत आला आहे

सध्या पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे या दौऱ्यामध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. अशातच आयसीसी विश्वचषकानंतर पाकिस्तानी चाहत्यांचा शत्रू झालेल्या हसन अलीला आयसीसी कडून मोठी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेशविरूध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान फलंदाजाला बाद केल्यानंतर केलेल्या वर्तवणुकीवरून तो अडचणीत आला आहे. सामन्यात चमकदार कामगिरी केलेल्या हसन अलीला आयसीसीकडून आचारसहिता अंतर्गत लेव्हल १ चे उल्लंघण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयसीसीच्या आरोपानुसार हसन अलीने खेळाची शिस्त मोडल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली आहे. तर सोबतच बांगलादेशच्या संघाला देखील २० टक्के दंड ठोठावला आहे.

पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान हसन अलीने गोलंदाजी करताना फलंदाजाला हातवारे करत इशारा केला होता. पहिल्या डावात पाकिस्तानचे १७ वे षटक टाकत असलेल्या हसन अलीने बांगलादेशच्या नुरूल हसनचा बळी घेतला आणि त्याला माघारी जाण्यास हातवारे करत सांगितले. त्याच्यावर आता आयसीसीने आक्षेप घेत कारवाई केली आहे.

हसन अली आयसीसीच्या नियमानुसार स्तर १ साठी दोषी आढळला आहे आणि त्याच्यावर सामन्यादरम्यान गैरवर्तणुक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तर पुढेदेखील त्याच्याकडून अशीच वर्तवणुक राहिल्यास आणखी कारवाई होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात हसन अलीने चांगली कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला. हसनने पहिल्या टी-२० सामन्यात ४ षटकांत केवळ २२ धावा देत ३ बळी पटकावले होते.


हे ही वाचा: Indonesia Masters 2021 : पी.व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव