IPL 2022 : IPL च्या ३ संघांकडून विदेशी टी-२० लीगमध्ये संघांची खरेदी

IPL 2022 : IPL च्या ३ संघांकडून विदेशी टी-२० लीगमध्ये संघांची खरेदी

आयपीएल २०२२ पासून आयपीएलच्या हंगामात नव्या दोन संघाचा समावेश होणार आहे. बीसीसीआयने मागील काही दिवसांपूर्वीच याबबातची माहिती दिली होती. यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघाचा समावेश असणार आहे. दरम्यान एमिरेट्स क्रिकेट बोर्ड (ECB) पुढील वर्षी जानेवारी, फेब्रुवारीपासून सहा संघांची एमिरेट्स टी-२० लीग सुरू करणार आहे. यामध्ये ३ आयपीएल संघांनीही गुंतवणूक केली आहे. यामध्ये कोलकत्ता नाइट रायडर्सच्या संघाचा मालक शाहरूख खान याच्या व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने इमिरेट्समध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी संघ खरेदी केले आहेत. तर एमिरेट्समध्ये होणारी स्पर्धा खूप काही आयपीएलशी निगडीत असल्याने स्पर्धेला दुसरी आयपीएल म्हटले जात आहे.

दरम्यान बीसीसीआय या स्पर्धेत भारतीय खेळांडूना सहभागी होण्याची परवानगी देऊ शकते. जर असे झाल्यास भारताचे पुरुष खेळाडू बीसीसीआय आणि आयसीसी व्यतिरिक्त इतर बोर्डाच्या लीगमध्ये अधिकृतपणे सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. या लीगच्या आयोजकांनी सीएसकेच्या संघाच्या ग्रुपसोबत देखील चर्चा केली होती. पण शेवटच्या क्षणी चेन्नईच्या ग्रुपने नकार कळवला आणि कोणताच संघ खरेदी केला नाही.

एमिरेट्समध्ये एकूण ६ संघ

इमिरेट्सम लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स, केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या मालकांव्यतिरिक्त कपरी ग्लोबल आणि ग्लेसर फॅमिली यांनीही संघ खरेदी केले आहेत. तर यांसोबत सिडनी सिक्सर्सच्या मालकांनीही या लीगमध्ये संघ खरेदी केला आहे. या स्पर्धेची रूपरेखा आयपीएलचे माजी सीईओ सुंदर रमन यांनी तयार केली आहे. तर या स्पर्धेचे मालकी हक्क इमिरेट्स क्रिकेट बोर्डाकडे असून याला आयसीसीनेही मान्यता दिली आहे.

भारतीय क्रिकेट बोर्डाने आतापर्यंत भारतीय खेळांडूना दुसऱ्या कोणत्या बोर्डातर्फे टी-२० किंवा टी-१० मध्ये खेळण्याची परवानगी दिली नाही. मात्र इमिरेट्स क्रिकेट बोर्डासाठी हा निर्णय बदलण्याची शक्यता आहे. दोन्हीही बोर्डांमधील संबध चांगले आहेत. ईसीबीने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेचे नियोजन केले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या आणि बीसीसीआयकडून होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे देखील ईसीबीने आयोजन केले होते.


हे ही वाचा: PAK vs BAN : पाकच्या गोलंदाजानेच मोडला शोएब अख्तरचा विश्वविक्रम


 

First Published on: November 20, 2021 3:30 PM
Exit mobile version