रिक्षा ओढणाऱ्याची मुलगी बनली सुवर्ण पदक विजेती

रिक्षा ओढणाऱ्याची मुलगी बनली सुवर्ण पदक विजेती

सौजन्य - NDTV Sports

भारताची हेप्टॉथ्लॉन खेळाडू स्वप्ना बर्मन हिने एशियन गेम्समध्ये बरेच कष्ट करून सुवर्ण पदकाची कमाई केली. परंतु, तिच्या कष्टांपेक्षाही तिच्या आईवडिलांनी जास्त कष्ट घेतले आहेत.

स्वप्नाचे वडील रिक्षाचालक 

स्वप्ना पश्चिम बंगलाच्या जलपायगुरीची रहिवासी आहे. तिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची आहे. स्वप्नाचे वडिल रिक्षा ओढण्याचे काम करतात. तर तिची आई चहाच्या मळयामध्ये काम करते. या दोघांनी स्वप्नाला तिची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी खूप कष्ट केले आहेत. स्वप्नानेही तिच्या आई-वडिलांचे कष्ट सार्थकी लावले.

एशियन गेम्समध्ये अप्रतिम कामगिरी 

हेप्टॉथ्लॉनमध्ये सात स्पर्धांत मिळून स्वप्नाने ६०२६ गुणांची कमाई करुन सुवर्ण पदक पटकावले. पात्रता फेरीत भालाफेक आणि लांब उडी यामध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखले. त्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्ण पदकावर नाव कोरले.

दुखापतीवर मात करत सुवर्ण पदकाला गवसणी

स्पर्धेआधी स्वप्नाचा जबडा खूप दुखावत होता. पण ही स्पर्धा जिंकण्याच्या जिद्दीने खेळत स्वप्ना जबड्याला पट्टी बांधून ट्रॅकवर उतरली आणि तिने स्पर्धेत विजय मिळवला. स्वप्नाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे तिच्या पायांना मिळून १२ बोटं आहेत. त्यामुळे तिला बऱ्याचदा बुटांचा त्रास होतो. परंतु तरीही ती हार मानत नाही.
First Published on: August 30, 2018 4:37 PM
Exit mobile version