इंग्लडच्या फुटबॉल खेळाडूंचे कबड्डी कबड्डी

इंग्लडच्या फुटबॉल खेळाडूंचे कबड्डी कबड्डी

इंग्लड फुटबॉल संघ

विरंगुळा म्हणून कोच गैरेथने मैदानावर मांडला कब्बडीचा डाव

एखाद्या खेळाचा खेळाडू सरावादरम्यान ताणतणाव दूर करण्यासाठी आपल्या आवडीचा खेळ खेळताना दिसून येतो. बहुतेकवेळा इतर सांघिक खेळांचे खेळाडू आपल्याला फुटबॉल खेळताना दिसतात. अशावेळी प्रश्न पडतो की फुटबॉलर्स सरावादरम्यान कोणता खेळ खेळत असतील? सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओत इंग्लडचे फुटबॉल खेळाडू वर्ल्डकपसाठी सरावादरम्यान कबड्डी खेळताना दिसून येत आहेत. यात हॅरी केन, डॅनी वेल्बेक, गॅरी काहिल, जेसी लिंगार्ड हे इंग्लडचे दिग्गज खेळाडू कबड्डी खेळताना दिसत आहेत.

फुटबॉल प्रेमींसाठी अतिशय महत्त्वाचा असा फिफा वर्ल्डकप यावर्षी रशियात होत आहे. १४ जून पासून सुरू होणाऱ्या फुटबॉल वर्ल्डकपसाठी जगभरातील सर्व फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशावेळी वर्ल्डकपसाठी सर्व देश जोमाने सराव करत आहेत. यावेळी इंग्लडचा संघ देखील सराव करताना दिसून आला. सरावादरम्यान इंग्लडचे कोच गैरेथ साउथगेट यांनी विरंगुळा म्हणून आपल्या खेळाडूंना कबड्डी खेळायला लावली. वर्ल्डकपसाठी इंग्लडची फुटबॉल टीम सज्ज झाली आहे. या वर्ल्डकपमध्ये कर्णधारपदाची धुरा हॅरी केन याच्यावर असणार आहे. इंग्लडचा गोलकीपर जो हार्टने वेस्ट हाम या क्लबकडून खेळताना खास प्रदर्शन केले नसल्याने तो यावर्षी वर्ल्डकप खेळणार नसल्याची माहिती आहे. ज्यामुळे इंग्लडच्या खेळावर याचा नक्की परिणाम दिसून येईल. वर्ल्डकपमध्ये इंग्लडचा संघ ग्रुप जी मध्ये असून त्यांच्यासोबत ट्युनिशिया, बेल्जियम आणि पनामा हे देश आहेत. या गटातील बेल्जियम हा इंग्लडसाठी सर्वात बलाढ्य संघ ठरणार आहे. इंग्लडचा पहिला सामना १८ जूनला ट्युनिशियासोबत वोल्गोग्राड येथे होणार आहे.

First Published on: June 5, 2018 10:42 AM
Exit mobile version