IPL 2021 : लवकरच विराटला सर्वजण मिस करतील, माजी खेळाडूचं मोठं विधान

IPL 2021 : लवकरच विराटला सर्वजण मिस करतील, माजी खेळाडूचं मोठं विधान

IPL 2021 : लवकरच विराटला सर्वजण मिस करतील, माजी खेळाडूचं मोठं विधान

आयपीएल २०२१ मध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगळूरुसाठी करो या मरो असा असणार आहे. बंगळूरु आणि कोलकातामध्ये सोमवारी होणाऱ्या सामन्यामध्ये विराटचा हा कर्णधार म्हणून शेवटचा सामना असणार की नाही हे ठरणार आहे. परंतु माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. विराट चांगला खेळाडू असून त्याच्या कर्णधार पदावरुन नेहमीच खटके उडाले आणि चर्चेचा विषय ठरत आला आहे.

भारतीय माजी क्रिकेट पटू आकाश चोप्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मला असे वाटत आहे की, काही कालावधीनंतर विराट कोहलीला मिस करतील. जे लोकं आता विराट कोहलीच्या कर्णधार गुणांबाबत शंका आहे. ते लोकं काही दिवसांनी विराट कोहलीच्या गुणांबाबत आणि कर्णधार वृत्तीवरुन उदाहरणं देतील” असे आकाश चोप्रा यांनी म्हटलं आहे.

माजी खेळाडू आकाश चोप्रांच्या मताचे काही जणांनी समर्थन केलं आहे. तर काही जणांनी केलं नाही. काही लोकांनी असे म्हटलं आहे की, कसोटी सामन्यात चाहते मिस करतील परंतु वन-डे टी-२० सामन्यात लोक आठवण काढणार नाही. तर एका चाहत्याने लिहिले आहे की, विराट कोहलीचा आक्रमकपणा नेहमी आठवेल.

टी-२० सामन्यांचे कर्णधार पदाचा राजीनामा

भारतीय कर्णधार विराट कोहलीने वर्ल्ड कप टी२० नंतर टी-२० फॉर्मेट मधील सामन्यांच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर बंगळूरु संघासोबत पुढे खेळत राहणार परंतु कर्णधार पद नसणार आहे. विराट कोहलीने भारतीय संघासह सर्वच टी-२० सामन्यांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराट कोहलीचा हा शेवटचा टी-२० वर्ल्डकप असेल यानंतर विराट कर्णधार पदाची जबाबदारी न स्वीकारता संघासोबत खेळणार आहे.


हेही वाचा : कोहलीनंतर RCB चे नेतृत्व कोणाकडे ? विराटचा कर्णधारपदाचा राजीनामा


 

First Published on: October 11, 2021 7:47 PM
Exit mobile version