फ्रान्सच्या विजयाला गालबोट

फ्रान्सच्या विजयाला गालबोट

सौजन्य- सोशल पोस्ट

फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना फ्रान्सने जिंकला. क्रोएशियावर ४-२ ने धमाकेदार विजय मिळवत फ्रान्सने विश्वचषक आपल्या नावे केला. फ्रान्सने दुसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला असून सर्व फ्रान्समध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले. मात्र या विजयाला गालबोट लागल्याची घटना फ्रान्समध्ये घडली आहे. आयफेल टॉवर परिसरात काही चाहत्यांनी धिंगाणा हा घालत परिसरातील दुकानांची तोडफोड केली. त्यातच काही चाहत्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. त्यामुळे पोलीस आणि चाहते यांच्यात मारामारी झाली. याला दंगलीचेही रूप आले. हे थांबवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा वापर केला. मात्र, हे चाहते थांबले नाही. ही दंगल इतकी हिंसक झाली की यामध्ये २ चाहत्यांचा मृत्यूदेखील झाला.त्यामुळे फ्रान्सच्या या विश्वचषक विजयच्या जल्लोषाला काहीसे गालबोट लागले.

२० वर्षांनी फ्रान्सने जिंकला विश्वचषक

फ्रान्स यंदा तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता, याआधी १९९८ ला आणि नंतर २००६ ला फ्रान्स विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचला होता. ज्यात १९९८ ला फ्रान्सने ब्राझीलला पराभूत करत विश्वचषक जिंकला. मात्र त्यानंतर फ्रान्सला इतक्या वर्ष विश्वचषक जिंकता आला नाही. त्यानंतर थेट २० वर्षानंतर फ्रान्सने विश्वचषक जिंकला आहे.
ऐतिहासिक आयफेल टॉवर येथे जल्लोषाला सुरूवात झाली.सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे हजारो चाहते लाल, पांढर्‍या आणि निळ्या रंगाचे ध्वज गुंडाळून आयफेल टॉवर येथे जमले होते. साधारण ९०,००० चाहत्यांनी एकत्रित हा सामना पहिला. जसा फ्रान्सने हा सामना जिंकला तसा या चाहत्यांनी फ्रेंच राष्ट्रगीत मोठमोठयाने गात विश्वचषक विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. तसेच आयफेल टॉवरजवळील बारमध्ये सामना पाहत असलेले मद्यपी चाहतेही त्यांच्यात मिसळले.

या चाहत्यांनी फटाकेही फोडले. तर काही चाहत्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले. या सामन्याच्या मध्यंतराच्या वेळापासून फ्रेंच पोलिसांनी आयफेल टॉवरच्या आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक बंद केली होती. याचे कारण म्हणजे ज्यावेळी फ्रान्सने बेल्जियमविरुद्ध उपांत्य सामना जिंकला होता त्यावेळी काही चाहत्यांनी गाड्यांवर चढून धिंगाणा घातला होता. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते. जेणेकरून काही चुकीचे प्रकार घडणार नाहीत.परंतु चाहत्यांच्या या जल्लोषासमोर पोलिसही हतबल झाले आणि या ऐतिहासिक विजयोत्सवाला गालबोट लागले.

First Published on: July 17, 2018 6:45 PM
Exit mobile version