आशिया जेतेपदासाठी श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आज अंतिम लढत, कोणता संघ बाजी मारणार?

आशिया जेतेपदासाठी श्रीलंका-पाकिस्तान यांच्यात आज अंतिम लढत, कोणता संघ बाजी मारणार?

आशिया जेतेपदासाठी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आज अंतिम लढत होणार आहेत. सुपर-४ गुणतालिकेत पहिल्या २ क्रमांकावर असलेल्या श्रीलंका आणि पाकिस्तान संघामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. तसेच अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यामुळे या दोन्हींपैकी कोणता संघ बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्रीलंकेचा संघ सहाव्यांदा जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पाकिस्तान तिसऱ्यांदा चषक पटकारवण्याचा प्रयत्न करेल. मागील झालेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभूत केला होता. त्यामुळे श्रीलंका संघाचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे पाकिस्तानला आज कसून मेहनत करावी लागणार आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत २२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. श्रीलंकेने यामध्ये ९ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने १३ सामने जिंकले आहेत. परंतु आशिया चषकात दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १६ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाने ११ वेळा विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान संघाने फक्त ५ सामने जिंकले आहेत.

श्रीलंकेकडे कुसल मेंडिस आणि पाथुम निसांका हे दोन उत्कृष्ट सलामीवीर आहेत. दुसरीकडे, बाबर आझम, मोहम्मद रिझवान, मोहम्मद नवाज आणि नसीम शाह हे खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ खेळण्याचा प्रयत्न करतील. २०१४ मध्ये श्रीलंका ज्याप्रमाणे वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. तसाच यावर्षीही संघाचा प्रयत्न असणार आहे.

असे असतील दोन्ही उभय संघ –

श्रीलंका संघ :

दासुन शानाका (कर्णधार), दानुष्का गुनाथिलक, पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष तीक्ष्णा, जेफ्री वांडर्से, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानिडू फर्नांडो आणि दिनेश चंडिमल.

पाकिस्तान संघ:

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहनी, हसन अली.


हेही वाचा : …ऐक यापुढे देशाला मध्ये आणू नकोस, अफगाण क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी शोएब अख्तरला खडसावले


 

First Published on: September 11, 2022 11:37 AM
Exit mobile version