घरक्रीडा...ऐक यापुढे देशाला मध्ये आणू नकोस, अफगाण क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी शोएब अख्तरला...

…ऐक यापुढे देशाला मध्ये आणू नकोस, अफगाण क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी शोएब अख्तरला खडसावले

Subscribe

आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४ मध्ये पाकिस्तान संघाने अफगाणिस्तान संघाचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तान संघाने आता सामन्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. येत्या रविवारी म्हणजे ११ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. यामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. परंतु पाकिस्तान आणि अफगाण यांच्यात सामन्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी अफगाण चाहत्यांनी स्टेडियमधील खुर्च्यांची मोडतोड केली आणि पाकिस्तानी चाहत्यांना बेदम मारहाण केली. मात्र, या घटनेनंतर सर्वप्रथम शोएब अख्तरने एक ट्वीट केले. परंतु या ट्वीटनंतर अफगाण क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला खडसावले.

- Advertisement -

शोएब अख्तरने सामन्यानंतर एक ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्याने स्टेडियमवरील झालेल्या राड्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच त्यानं लिहिलंय की, अफगाण चाहते असे करत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा असे केले आहे. हा एक खेळ असून तो भावनेने घेतला पाहिजे, असं ट्वीट शोएब अख्तरने केलंय.

- Advertisement -

या ट्वीटनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शफिक स्टानिकझाई यांना टॅग करत ट्विटरवर आपली तक्रार नोंदवली आणि शफिक स्टानिकझाई यांनी शोएबलाच खडसावले. अशा परिस्थितीत तुम्ही लोकांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. क्रिकेट जगतात असे अनेकदा घडले आहे. तुम्ही कबीर खान, इंझमाम भाई आणि रशीद लतीफ यांना विचारा की आम्ही त्यांच्याशी कसे वागतो. मी तुला सल्ला देतो की, यापुढे देशाला मध्ये आणू नकोस, असं शफिक स्टानिकझाई म्हणाले.


हेही वाचा : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई महापालिका सुसज्ज, भाविकांना खबरदारीची सूचना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -