टी-20 विश्वचषकात यूएईच्या युवा खेळाडूची हॅटट्रिक; गोलंदाजाची सर्वत्र चर्चा

टी-20 विश्वचषकात यूएईच्या युवा खेळाडूची हॅटट्रिक; गोलंदाजाची सर्वत्र चर्चा

टी-20 विश्वचषकातील श्रीलंकेचा दुसरा सामना युएईशी झाला. या सामन्यात श्रीलंकेने 79 धावांनी युएईचा पराभव केला. विशेष म्हणजे हा सामना श्रीलंकेने जिंकला असला तरी, पराभूत संघातील फिरकीपटू कार्तिक मयप्पनची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. कारण कार्तिक मयप्पनने विश्वचषक स्पर्धेतील पहिली हॅट्रीक केली आहे. कार्तिक मयप्पनने सामन्याच्या 15व्या षटकात ही हॅट्रीक केली. (first hat trick of UAE Karthik Meiyappan against sri lanka in t20 World Cup)

युएईचा लेगब्रेक गोलंदाज कार्तिकने 15 वी ओव्हर टाकत श्रीलंकेच्या 3 महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. यावेळी कार्तिकने 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भानुका राजपक्षाला 5 धावांवर असलांकासह श्रीलंकेचा कर्णधार शनाकाला 0 धावांवर तंबूत धाडले. ज्यामुळे श्रीलंकेचा स्कोर 152 इतकाच होऊ शकला.

कार्तिक मयप्पनची 15वी ओव्हर

युएईचा संघ : सीपी रिझवान (कर्णधार), वृत्त अरविंद, चिराग सुरी, मुहम्मद वसीम, बासिल हमीद, आर्यन लाक्रा, जवर फरीद, काशिफ दाऊद, कार्तिक मयप्पन, अहमद रझा, जहूर खान, जुनैद सिद्दीकी, साबीर अली, अलीशान शराफू, अयान माझे.

रविवार 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात झाली. सुरूवातीपासूनच प्रत्येक सामन्यात लढत पाहायला मिळत आहे. त्याशिवाय छोट्या संघाची कामगिरी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे टी-20 विश्वचषक कोण जिंकणार हे पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींना उत्सुकता लागली आहे.


हेही वाचा –  पावसामुळे भारत-न्यूझीलंडचा सराव सामना रद्द; आता थेट पाकिस्तानशी लढत

First Published on: October 19, 2022 4:27 PM
Exit mobile version