सचिन तेंडुलकरचं स्टेट्स मला माहिती नव्हतं, शोएब अख्तरने सांगितला किस्सा

सचिन तेंडुलकरचं स्टेट्स मला माहिती नव्हतं, शोएब अख्तरने सांगितला किस्सा

आशिया चषक २०२२ सामन्याला येत्या २८ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. चषकातील पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांची लढत पाहण्यासाठी चाहते उत्सुकही झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सचिन तेंडुलकरबद्दल एक किस्सा सांगितला आहे.

स्टार स्पोर्टसवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान शोएब अख्तरने एक किस्सा सांगितला आहे. सचिन तेंडुलकर कोण आहे आणि त्याचं स्टेटस काय आहे, हे मला माहिती नव्हतं, असं अख्तर म्हणाला. सकलेन मुश्ताकने म मला सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वात मोठा फलंदाज असल्याचे सांगितले.

शोएब अख्तरने हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधला. मी आपल्याच जगात वावरत होतो, त्यामुळे मला हे माहितीच नव्हतं. समोर कोणता खेळाडू आहे मी पाहत नव्हतो. फक्त किती जलद गोलंदाजी करता येईल, हे मी पाहत होतो. जर बॉल स्विंग होत असेल तर गोलंदाजी केव्हा करायची यावर आमचं लक्ष असायचं. जोपर्यंत तुम्ही पाकिस्तानला मॅच जिंकवून देणार नाही. तोपर्यंत तुम्ही स्टार बनणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न संघाला मॅच जिंकवून देण्याचाच असल्याचं अख्तरने स्पष्ट केलं.

भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकल्यावर भारतीय संघ आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.

भारत आणि झिबाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना २० ऑगस्ट आणि तिसरा सामना २२ ऑगस्टला खेळवला जाणार आहे.


हेही वाचा : टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज, बीसीसीआयकडून फोटो शेअर


 

First Published on: August 15, 2022 4:40 PM
Exit mobile version