जपानी रेसलर आणि नेटफ्लिक्स स्टार हाना किमूराचे निधन

जपानी रेसलर आणि नेटफ्लिक्स स्टार हाना किमूराचे निधन

हाना किमूरा

व्यावसायिक कुस्तीच्या जगात वेगाने प्रसिद्धी मिळवणार्‍या जपानच्या कुस्तीपटू हाना किमूरा हिचे शनिवारी निधन झाले. ती अवघ्या २२ वर्षांची होती. नुकताच तिने नेटफ्लिक्स रिअॅलिटी शो ‘टेरेस हाऊस: टोक्यो’ मध्ये काम देखील केले होते. ‘टेरस हाउस’ या शोमध्ये तीन पुरुष आणि तीन महिला हाऊसमध्ये तात्पुरते एकत्र राहत असतात अशी कथा या शोची होती,  मात्र कोरोना व्हायरसमुळे हा शो तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.

हाना किमूराच्या जवळच्या मित्रांनी ट्विटरवर तिच्या निधनाची माहिती दिली आहे. दरम्यान किमूरा तिच्या घरी मृत अवस्थेत आढळली होती, परंतु अद्याप तिच्या मृत्यूमागचे कोणतेही कारण स्पष्ट झालेले नाही, या घटनेचा पोलिस तपास करत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे की, ऑनलाइन बुलिंग अर्थात गुंडगिरी हे किमूराच्या मृत्यूचे कारण असू शकते. कारण नेटफ्लिक्सच्या रियल्टी शो ‘टेरेस हाऊस’ नंतर लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिला लक्ष्य करत असून लोकं सोशल मीडियावर तिच्याविरूद्ध द्वेषयुक्त मॅसेज करताना दिसत होते.

नुकतेच तिने पोस्ट केलेली काही फोटो आणि इन्स्टाग्रामवर तिचे कॅप्शन पाहता असे दिसते की, ती काही काळ निराश झाली होती. अलीकडेच तिने तिच्या पाळीव मांजरीसह एक फोटोही पोस्ट केला असून, ‘गुडबाय’ असे कॅप्शन दिले होते. तसेच इंस्टाग्रामवर किमूराने दुसर्‍या पोस्टमध्ये असे लिहिले होती की, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे, आनंदी आणि दीर्घ आयुष्य जगा, मला माफ करा.’

ऑल एलीट रेसलिंगने व्यक्त केलं दुःखं

First Published on: May 25, 2020 12:30 PM
Exit mobile version