“तू आता कर्णधार नाहीस त्यामुळे…”;हार्दिक पांड्याला विराटच्या प्रशिक्षकांकडून इशारा

“तू आता कर्णधार नाहीस त्यामुळे…”;हार्दिक पांड्याला विराटच्या प्रशिक्षकांकडून इशारा

यंदाच्या आयपीएलच्या १५ व्या (IPL 2022) पर्वात नवा संघ गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएल २०२२ चे विजेतेपद पटकावले. कर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या गुजरात संघाने उत्तम कामगिरी करत पदार्पणाच्या पहिल्याच वर्षी आयपीएलच्या चषकावर नाव कोरले. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने तर हार्दिक पांड्या हा भविष्यातील कर्णधार असल्याचे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी कान टोचले आहेत.

हार्दिक भारताचा भविष्यातील कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास मायकल वॉनने व्यक्त केला. “नव्या कोऱ्या संघाने IPL जिंकणे ही उत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाला पुढील २ वर्षांत नव्या कर्णधाराची गरज भासली, तर मी नक्कीच हार्दिक पांड्याव्यतिरिक्त इतर कोणाचा विचार करणार नाही”, असे ट्वीट वॉनने केले. यावर राजकुमार शर्मा यांनी वक्तव्य केले.

हेही वाचा – Women IPL साठी बीसीसीआयचे नियोजन सुरू; ‘या’ महिन्यात स्पर्धा होण्याची शक्यता

“हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये उत्तम फलंदाजी केली. मिळालेल्या कर्णधार पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. परंतु, हार्दिक गुजरातचा कर्णधार होता, पण तो आता भारतीय संघात कर्णधार नाही हे त्याने लक्षात ठेवावे. भारतीय संघातील त्याचा रोल ठरलेला आहे. आता त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी मिळणार नाही. त्याला भारतीय संगात फिनिशर म्हणूनच स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे त्याने त्या प्रकारची तयारी करावी”, असे वक्तव्य विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी केले.

आयपीएल २०२२ पूर्वी हार्दिक पांड्या फिटनेसमुळे संघाबाहेर होता. त्याला एकही सामने खेळता आले नव्हते. त्यामुळे आयपीएलमध्ये गुजरातचे कर्णदार पद आणि फलंदाजी, गोलंदाजी कसा करेल यांसह अनेक सवाल उपस्थित केले जात होते. मात्र, हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करत आणि कर्णधार पदाला न्याय देत आपल्या संघाला थेट आयपीएलचे चषक मिळवून दिले.


हेही वाचा – U19 Women’s T20 World Cup: पहिल्यांदाच खेळवलं जाणार महिला U19 T20 विश्वचषक, कोणते १२ संघ झाले क्वालिफाय?

First Published on: June 3, 2022 12:14 PM
Exit mobile version