घरक्रीडाWomen IPL साठी बीसीसीआयचे नियोजन सुरू; 'या' महिन्यात स्पर्धा होण्याची शक्यता

Women IPL साठी बीसीसीआयचे नियोजन सुरू; ‘या’ महिन्यात स्पर्धा होण्याची शक्यता

Subscribe

महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे यंदाचे शेवटचे वर्ष होते. आतापर्यंत तीन वेळा महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मात्र आता ही स्पर्धा बंद करून थेट महिला आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआने नियोजनाला सुरूवात केली आहे.

महिला टी-20 चॅलेंज (Women’s T-20 Challenge) स्पर्धेचे यंदाचे शेवटचे वर्ष होते. आतापर्यंत तीन वेळा महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मात्र आता ही स्पर्धा बंद करून थेट महिला आयपीएल (Women IPL) स्पर्धा खेळवली जाणार आहे. यासाठी बीसीसीआने नियोजनाला सुरूवात केली आहे. त्यानुसार, पुढील वर्षी होणाऱ्या महिला आयपीएलसाठी बीसीसीआय महिना निश्चित करण्याच्या तयारीला लागली आहे. बीसीसीआयच्या नियोजनानुसार, महिला आयपीएल मार्च महिन्यामध्ये खेळवली जाण्याची शक्यता आहे. तसेच मार्च महिन्यात शक्य न झाल्यास सप्टेंबर महिन्यात खेळवली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – बीसीसीआय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरुन सौरव गांगुलीचा खुलासा, म्हणाला…

- Advertisement -

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयाचे (BCCI) माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाहा (Jay Shaha) यांनी महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेबाबत याआधीच घोषणा केली होती. बीसीसीआयने याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसंच इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासोबतही चर्चा केली आहे. शिवाय, या स्पर्धेसाठी मार्च महिन्यात वेळ देण्यात यावा. यसंदर्भात बोर्ड आयसीसीसोबतही बोलणार असल्याचे समजते.

हेही वाचा – Women’s T20 Challenge 2022 : व्हेलोसिटी संघाचा पराभव करत सुपरनोव्हाने पटकावले तिसरे जेतेपद

- Advertisement -

आयपीएल खेळवण्याच्या मागणीला जोर

भारतीय महिला टीमच्या चांगल्या कामगिरीनंतर महिला आयपीएल खेळवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शिवाय यंदाचा महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचा अंतिम सामन्याला 8 हजारांहून अधिक चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता पुढील वर्षीपासून ही महिला आयपीएल खेळवली जाणार आहे.

कॅरेबियन प्रीमियर लीग, द हंड्रेड आणि महिला बिग बॅश जुलै ते नोव्हेंबर महिन्यात होते. त्यामुळे बीसीसीआयला मार्च महिना योग्य वाटत आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंसाठीही मार्च महिनाच सोयीचा आहे. इतर देशांच्या बोर्डानीही बीसीसीआयला सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.


हेही वाचा – टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी अमेरिका संघ सज्ज; ‘या’ भारतीय खेळाडूंचा समावेश

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -