…म्हणून हरमनप्रीतसाठी अंतिम सामन्याचा दिवस खास

…म्हणून हरमनप्रीतसाठी अंतिम सामन्याचा दिवस खास

उपांत्य फेरीसाठी प्रत्यक्षात मैदानावर न उतारताही अंतिम लढतीत प्रवेश मिळवल्यामुळे भारतीय महिला संघात आनंदाचे वातावरण आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला विश्वचषक २०-२० क्रिकेट स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पोहचवण्याचा मान मिळाला आहे. मात्र, आई-वडिलांसमोर खेळण्याची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली आहे. रविवार ( ८ मार्च ) महिला दिन असल्याने हा दिवस नक्कीच हरमनप्रीतसाठी खास आहे.

आपल्या आई- वडीलांसमोर खेळण्याची इच्छा पूर्ण झाली नाही, असे म्हणताना क्रिकेटच्या नियमात काही बदल झाले पाहिजेत, असे देखील हरमनप्रीतने म्हटले आहे. ‘या कारकीर्दीत माझे आई-वडील पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात माझा खेळ पाहत होते. मात्र, आई-वडीलांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही. यानंतरच्या अंतिम सामन्यात त्यांनी नक्कीच उपस्थित राहावे’, अशी विनंती देखील यावेळेस तिने केली आहे.

अतिंम सामन्याचा दिवस का आहे खास?

भारतीय महिला संघाची कर्णधार ही आपण थेट अंतिम सामन्यात पोहचल्या बद्दल संघातील खेळाडूमचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला आहे. यासोबत एक विशेष बाब म्हणजे रविवार ( ८ मार्च ) रोजी महिला दिनाच्या दिवशीच पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटचा महिला संघ अंतिम सामन्यात आपली छाप पडणार आहे. याच दिवशी हरमनप्रीतचा ३१वा वाढदिवसही आहे.

हेही वाचा- पावसाच्या हजेरीमुळे भारतीय महिला संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

‘इंग्लंड सोबत खेळण्यात मजा आली असती’

भारतीय महिला संघाचा इंग्लंड विरूद्धचा पहिला उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला आणि भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी न खेळताही थेट अंतिम सामन्यात उडी घेतली. मात्र, ‘उपांत्य फेरीत इंग्लंडला नमवून आम्हाला अंतिम सामन्यात जायला अधिक आवडल असतं, परंतु क्रिकेटच्या नियमांचे पालन पूर्वी पासून करण्यात आले आहे. आम्ही त्याविरोधात काही करू शकत नाही.’ मात्र, नियमात बदल केले पाहिजेत अशी इच्छा देखील यावेळी तिने व्यक्त केली आहे.

‘अंतिम सामन्याच्या फेरी पर्यंत पोहचण्यासाठी चाहत्यांकडून उत्साह आणि प्रेरणा मिळाली असून अंतिम लढतीत देखील चाहत्यांच्या पाठींबाची आवश्यकता आहे. त्यामुळे चाहत्यांनी अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडीयममध्ये गर्दी करावी’, असे हरमनप्रीत म्हणाली आहे. पहिल्यायांदाच भारताचा महिला संघ अंतिम सामन्यात पोहचला आहे ही बाब तर आहेच मात्र त्यासोबतच याच दिवशी हरमनप्रीतचा वाढदिवसही आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत कशा प्रकारे मजल मारणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


हेही वाचा – ऑस्ट्रलिया आणि भारतामध्ये रंगणार वर्ल्ड कपचा अंतिम सामना


 

First Published on: March 6, 2020 1:09 PM
Exit mobile version