घरक्रीडाऑस्ट्रलिया आणि भारतामध्ये रंगणार वर्ल्ड कपचा अंतिम सामना

ऑस्ट्रलिया आणि भारतामध्ये रंगणार वर्ल्ड कपचा अंतिम सामना

Subscribe

भारतीय संघाने तब्बल सात वर्षांनी पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर, ऑस्ट्रलियाने चार वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा आज दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ५ धावांनी जिंकत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रलियाची भिडत भारताशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. यामुळे हा सामना कमी षटकांचा खेळवला गेला.

आफ्रिका संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत ऑस्ट्रलिया संघाला १३४ धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाकडून मेग लेनिंगने सर्वात जास्त ४९ धावा केल्या तर, बेथ मूनीने २८ धावा केल्या. यावेळी पावसाने मैदानावर हजेरी लावली. यामुळे आफ्रिकेला १३ षटकांमध्ये ९८ धावांचे आव्हान देण्यात आले. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिका संघाचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

- Advertisement -

हेही वाचा – रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना ‘करोना’चा धोका

ऑस्ट्रलियाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिका संघाला दुसऱ्याच षटकात लिजेल लीच्या स्वरुपात धक्का बसला. आफ्रिकेच्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांना चांगली सुरुवात करता आली नाही. लीझेल ली १० तर डॅन व्हॅन निकेर्क १२ धावाच केल्या. आफ्रिकाकडून लॉरा वोल्वार्ट हीने ४१ धावा करत एकेरी झुंज दिली. ऑस्ट्रलियाकडून मेगन शट हिने दोन गडी बाद केले.

दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेला पहिला उपांत्य सामना पावसामुळे रद्द झाला होता. गुणतालिकेनुसार भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाने तब्बल सात वर्षांनी पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर, ऑस्ट्रलियाने चार वेळा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे भारतासमोर गतविजेत्या ऑस्ट्रलियाचे तगडे आव्हान असणार आहे. ८ मार्च रोजी हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारतीय वेळेनूसार दुपारी १२.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -