Hockey World Cup 2018 : ४३ वर्षानंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्यास भारत सज्ज

Hockey World Cup 2018 : ४३ वर्षानंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्यास भारत सज्ज

भारतीय हॉकी संघ

१४ व्या पुरुष हॉकी विश्वचषकाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथे होणार आहे. विश्वचषक भारतात होत असल्याने भारतीय संघाला तो जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. भारताने याआधी १९७५ मध्ये क्वालालंपूर येथे झालेला विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यानंतर भारताचे विश्वचषकात प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. मात्र यावेळी भारतीय संघाला आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळात असल्याने त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलिया, अर्जेन्टिना, नेदरलँड्स ही दावेदार 

भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांनी मागील महिन्यात झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पण पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नव्हता. त्यामुळे या स्पर्धेतही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, भारताला विश्वचषक जिंकणे सोपे जाणार नाही. त्यांना विश्वचषक जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया, अर्जेन्टिना, नेदरलँड्स, जर्मनी यासारख्या संघांना मागे टाकावे लागेल.

भारतीय संघात चांगला समतोल

भारतीय संघात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही खेळाडूंचा चांगला समतोल आहे. त्यामुळे भारताला ४३ वर्षानंतर पुन्हा विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी आहे.
First Published on: November 28, 2018 5:30 PM
Exit mobile version