Hylo Open 2021: किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत मारली बाजी; उपांत्य फेरीत केला प्रवेश

Hylo Open 2021: किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत मारली बाजी; उपांत्य फेरीत केला प्रवेश

भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने आपली चमकदार कामगिरी कायम ठेवत हायलो ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत किदाम्बी श्रीकांतने शेवटच्या क्षणांपर्यंत झुंज देत एनजी का लाँग एंगसचा २१-११, १२-२१, २१-१९ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. भारताचा स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने आपले शानदार प्रदर्शन करत हाइलो ओपन सुपर ५०० मध्ये विजय मिळवत स्पर्धेतील एका मोठ्या विजयाची नोंद केली. त्याने शुक्रवारी झालेल्या सामन्यात एनजी का लाँग एंगसचा मोठ्या फरकाने पराभव केला.

स्पर्धेतील क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने क्रमवारीत आपल्यापेक्षा पुढे असलेल्या हॉंगकॉंगच्या शटलरला १ तास आणि ४ मिनिटे चाललेल्या सामन्यात चांगली टक्कर दिली आणि अखेर सामन्यावर विजय मिळवला. श्रीकांतने पहिल्या सेटमध्ये अगदी सहज विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र लाँगने दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारत १२-२१ असा विजय मिळवला. याच्यानंतर निर्णायक सामन्यांत दोन्ही खेळाडूंमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत टक्कर पहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर किदाम्बी श्रीकांतने बाजी मारत सामना आपल्या नावावर केला.

श्रीकांतचा उपांत्य फेरीतील सामना मलेशियाच्या ली जी सिया सोबत होणार आहे


हे ही वाचा:T20 world cup 2021: “सोशल मीडियाला कोणीही रोखू शकत नाही; शोएब अख्तरचा न्यूझीलंडला इशारा


 

First Published on: November 6, 2021 7:30 PM
Exit mobile version