ICC T20 WORLD CUP : पाकिस्तान संघाला मोठा धक्का, मिस्बाह आणि वकार युनूस यांचा राजीनामा

ICC T20 WORLD CUP : पाकिस्तान संघाला मोठा धक्का, मिस्बाह आणि वकार युनूस यांचा राजीनामा

पूर्व कसोटी कर्णधार रमीज राजा यांची १३ सप्टेंबर ला होणार PCB पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेयरमन म्हणुन निवड.

पाकिस्तान क्रिकेटला सोमवारी मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तानच्या दोन्ही माजी खेळाडूंनी प्रशिक्षक पदाचा कार्यकाल संपण्याच्या एक वर्ष आधीच राजीनामा दिला आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी केवळ एकच महीन्याचा अवधी असताना पाकिस्तान क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे,

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोमवारी टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या माहितीनुसार वकार आणि मिस्बाह यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे आणि माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताक तसेच अब्दुल रज्जाक यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणुन निवड करण्यात आली आहे.

मिस्बाह आणि वकार यांनी कामाचा ताण, कुटूंबापासुन दुर आणि बायोबबल मध्ये राहणे ही राजीनाम्याची देण्याची कारणं  स्पष्ट केली आहेत. हा निर्णय त्यांनी पाकिस्तानचे पूर्व कसोटी कर्णधार रमीज राजा यांची १३ सप्टेंबर ला PCB पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेयरमन म्हणुन निवडण्यात करण्यात येणार आहे. रमीज राजा यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर मिस्बाह-उल-हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनूस हे योग्य प्रशिक्षक नसल्याच वर्तवलं होत.

टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली त्यात रमीज राजा यांची महत्वाची भुमिका दिसत आहे. त्यांनी तरुण विस्फोटक फलंदाजांना निवडण्याकडे भर दिला.

मिस्बाह आणि वकार दोघांनाही सप्टेंबर २०१९ मध्ये प्रशिक्षक म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते, अशा स्थितीत दोघांकडे फक्त एक वर्षाचा करार शिल्लक होता.

न्यूझीलंड संघ ११ सप्टेंबरपासून पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. त्याना तीन एकदिवसीय आणि पाच टी -२० सामने खेळायचे आहेत, ज्यासाठी पाकिस्तानी संघ ८ सप्टेंबरला इस्लामाबादमध्ये जमणार आहे. अशा स्थितीत आता संघाचे प्रशिक्षण पद सकलैन आणि रज्जाक यांच्या हातात असेल.

 

आयसीसी टि-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ –

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, आजम खान, हॅरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन आफ्रीदी

राखीव खेळाडू : फखर जमान, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

First Published on: September 6, 2021 5:22 PM
Exit mobile version