International table tennis : आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत साथियन, हरमीतला विजेतेपद

International table tennis : आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत साथियन, हरमीतला विजेतेपद

जी.साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय खेळाडूंनी ट्युनिशिया येथे झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेडर ट्युनिस आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. दोघांनीही एकत्र खेळताना पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत इमॅन्युअल लेबेसन आणि अलेक्झांड्रे कॅसिन या जोडीचा पराभव करत पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले. साथियन आणि हरमीत या जोडीने लेबेसन आणि कॅन्सिनच्या फ्रेंच जोडीचा ११-९,४-११,११-९,११-६ असा पराभव केला. भारतीय जोडीने पहिल्या फेरीत निसटता विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या फेरीत निराशाजनक खेळ पहायला मिळाला. मात्र त्यांनी योग्य वेळेत आपली कामगिरी सुधारून सामन्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी तिसरी आणि चौथी अशा सलग २ फेऱ्या जिंकत सामन्यावर विजय मिळवला.

विजयानंतर साथियानने त्याची प्रतिकिया देताना सांगितले, “पुरूष दुहेरीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजय मिळवायची ही माझी पहिलीच वेळ होती. तर हरमीतसोबत खेळताणाचेही हे माझे पहिले विजेतेपद आहे. आम्ही मोठ्या कालावधीनंतर एकत्र खेळत आहोत. त्यामुळे सुरूवातीलाच सुवर्ण पदक मिळवणे ही समाधानकारक बाब आहे त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे” असे साथियानने सांगितले.

साथियानने आपल्या या यशाचे श्रेय साथीदार हरमीतला दिले. साथियान आणि हरमीतची जोडीने उपांत्य फेरीत पिछाडीवर असताना देखील हंगेरीच्या नॅन्दोर एसेकी आणि अॅडम झुडीच्या जोडीचा पराभव केला होता.

First Published on: October 31, 2021 8:08 PM
Exit mobile version