अखेर डाव भारताचाच! बांगलादेशचा दणदणीत पराभव

अखेर डाव भारताचाच! बांगलादेशचा दणदणीत पराभव

अखेर डाव भारताचाच! बांगलादेशचा दणदणीत पराभव

इंदूर कसोटी सामन्यात भारताने बांग्लादेशचा १ डाव १३० धावांनी पराभव केला आहे. या पराभवासह कसोटी सामन्यात भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. आता बांगलादेश सोबतचा पुढचा आणि शेवटचा सामना २२ डिसेंबरपासून कोलकाताच्या ईडन गार्डन येथे होणार आहे. या सामन्यात भारताचे गोलंदाज आणि फलंदाज गोघांची कामगिरी मौल्यवान ठरली आहे. याशिवाय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात कसोटी सामन्यात एका डाव्याने विजय मिळवणारा हा १०वा सामना ठरला आहे. याअगोदर महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने नऊ सामने एका डावाने जिंकून आणले आहेत.

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात पहिल्या डावात बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या १५० धावांबर तंबूत परतला. तर भारतीय संघाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात ४९३ धावा करुन डाव डिक्लेअर केला. त्यानंतर दुसऱ्या डावासाठी फलंदाजी करण्यासाठी आलेला बांगलादेश संघाचे फलंदाज २१३ धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताचा सहज एक डाव आणि १३० धावांवर विजय झाला. दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर मयांक अगरवालची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांने ३३० चेंडूंवर २४३ धावा केल्या. त्याखालोखाल अजिंक्य राहाणेने ८६ धावा, चेतेश्वर पुजाराने ५४ धावा केल्या.

दोन्ही डावात मोहम्मद शमीची उल्लेखणीय कामगिरी

या सामन्यात दोन्ही डावांमध्ये भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीची कामगिरी महत्त्वाची ठरली आहे. शमीने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात १ तर दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याखालोखाल इशांत शर्माने पहिल्या डावात १ तर दुसऱ्या डावात २ तर उमेश यादवने दोन्ही डावात प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

First Published on: November 16, 2019 6:13 PM
Exit mobile version