Ind vs Eng : वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; सूर्यकुमारची संघात निवड

Ind vs Eng : वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; सूर्यकुमारची संघात निवड

वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; सूर्यकुमारची संघात निवड

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करून संघाची घोषणा केली. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी -२० मध्ये अर्धशतक झळकावलेल्या सूर्यकुमार यादवला वनडे संघात स्थान मिळालं आहे. २३ मार्चपासून ही मालिका खेळवली जाईल.

भारतीय संघात फिरकी अष्टपैलू क्रुणाल पंड्या आणि युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये १४ बळी घेणाऱ्या कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकेल. बडोद्याचा कर्णधार क्रुणालनेही विजय हजारे ट्रॉफी २०२०-२१ हंगामात आपल्या कामगिरीने प्रभावित केले. त्याने ५ सामन्यात १२९.३३ च्या सरासरीने ३८८ धावा केल्या, त्यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादवने अर्धशतकांसह पदार्पणात सर्वांना प्रभावित केले. त्याने ३१ चेंडूत ५७ धावा फटकावल्या. या खेळीत त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. सूर्यकुमारच्या खेळीमुळे इंग्लंडचा ८ धावांनी पराभव करण्यात भारताला यश आले. सूर्यकुमारला सामनावीर पुरस्कार मिळाला.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक –

२३ मार्च – पहिला सामना
२६ मार्च – दुसरा सामना
२८ मार्च – तिसरा सामना
(सर्व सामने पुण्यात खेळवले जाणार)

भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मो. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

 

First Published on: March 19, 2021 11:40 AM
Exit mobile version