IND vs NZ : मालिकेत टिकण्यासाठी भारताला उद्याचा सामना जिंकावाच लागणार

IND vs NZ : मालिकेत टिकण्यासाठी भारताला उद्याचा सामना जिंकावाच लागणार

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील भारताचा दुसरा वनडे सामना उद्या होणार असून, हॅमिल्टन येथे हा सामना होणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना करो या मरो अशा परिस्थितीचा असणार आहे. ऑकलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 7 गडी राखून पराभव केला होता. (Ind Vs Nz 2nd Odi Do Or Die India Needs A Win In The Second Match To Save The Series)

या सामन्यात भारताने ३०६ धावा केल्या होत्या. मात्र तरिही भारतीय पराभूत झाला. केन विलियम्सन आणि टॉम लॅथम यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिला वनडे सामना जिंकला. मात्र, उद्या होणार दुसरा वनडे सामना भारतासाठी महत्वाचा असल्याने हा सामना भारत जिंकणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. अष्टपैलू दीपक हुडा याला संधी दिली जाऊ शकते. तसेच फिरकीपटू चहल ऐवजी कुलदीपला संघात स्थान मिळू शकते. वेगवान गोलंदाजीत फारसे बदल होईल असे सध्या तरी चित्र दिसत नाही.

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युजवेंद्र चहल, अरविंद चहल, अरविंद चहल. सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ

केन विलियम्सन (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, फिन ऍलन, डेव्हन कॉनवे, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, अॅडम मिल्ने, टिम साउदी


हेही वाचा – Argentina vs Mexico: मेस्सीला शिवीगाळ केल्याने अर्जेंटिना-मेक्सिकोच्या चाहत्यांमध्ये हाणामारी

First Published on: November 26, 2022 10:34 PM
Exit mobile version